Viral Video: करीनाच्या जेहची कॅमेरासमोर येण्यासाठी धडपड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

जेव्हा पण जेह पापाराझींच्यासमोर आला की, त्याच्याकडे कुतूहलाने बघतात. पुन्हा एकदा जेहचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jeh Ali Khan
Jeh Ali Khan Saam Tv

मुंबई: बॉलिवूडमधील कलाकार (Bollywood Celebrity) हॉटेल्स किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जर दिसलेच तर पापाराझींच्या (Photographer) गराड्यात येतातच. कलाकारांसोबतच त्यांच्या मुलांचीही पापाराझींच्यासमोर वेगळीच क्रेझ असते. बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि सैफ अली खानचे यांची दोन्ही लहान मुले लहान वयातच मीडियाच्या गराड्यात येतात. जेव्हा पण जेह पापाराझींच्यासमोर आला की, त्याच्याकडे कुतूहलाने बघतात. पुन्हा एकदा जेहचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jeh Ali Khan
Viral Video: चिमुकल्याने गायले गाणे; अवघ्या काही वेळातच जयेश ट्रेंडिंगला

सेलिब्रेटी फोटोग्राफर फिल्मी ग्यानने नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जेह हा त्याच्या वांद्र्यातील घराजवळ जाताना दिसतोय. त्यावेळी काही पापाराझी त्याचा फोटो काढत आहेत. यावेळी जेह त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत त्यांच्याजवळ धावत जातो. यावेळी त्याला सांभाळणारी नॅनी (आया) ही त्याचा हात पकडून त्याला आत नेण्याचा प्रयत्न करते. मात्र जेहने त्याचा हात झटकत पापाराझींना पोज दिली. हा सर्व मजेशीर प्रकार एका व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये, त्याने पांढर्‍या रंगाचा टी-शर्ट आणि गुलाबी शॉर्ट्स घातले आहेत. त्याच्या या व्हिडीओवर अनेकजणांनी कमेंट केल्या आहेत. त्याला इंटरव्ह्यू देण्याची खूप इच्छा आहे. तर काहींनी जेहला क्यूट बेबी देखील संबोधले आहे. त्याला कॅमेऱ्याबाबत कुतूहल वाटत असल्याचे दिसत आहे.

Edit By- Chetan Bodke

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com