Kareena Kapoor Khan: बॉलिवूडच्या बेबोचा एक्शनचा धमाका; 'द वेस्टलँडर्स'मध्ये साकारणार ही महत्वपूर्ण भूमिका

करीना लवकरच काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात आहे. आता करीना कपूर लवकरच एका पॉडकास्टला आवाज देणार आहे.
Kareena Kapoor
Kareena KapoorSaam Tv

Kareena Kapoor In The Wastelanders: खान सिस्टर्स नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. सध्या करीना कपूर- खान आपल्या आगामी कलाकृतीमुळे बरीच चर्चेत आहे. करीना लवकरच काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात आहे. आता करीना कपूर लवकरच एका पॉडकास्टला आवाज देणार आहे. अलीकडेच करीनाने तिच्या या पॉडकास्ट मालिकेची घोषणा केली आहे. यादरम्यान करीनाने मार्वलचे 'द वेस्टलँडर्स'मधील ब्लॅक विडोची भूमिका साकारणार असून ही सीरिज audible.in वर प्रदर्शित होणार आहे.

Kareena Kapoor
Kartik Aaryan: कार्तिक आर्यनची थेट तुलना अल्लू अर्जुनशी; 'त्या'मागील उत्तर केले स्पष्ट

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत करिनाने तिच्या आवाजाचा अभिनय करण्याचा अनुभव सांगितला, यावेळी करीना म्हणते, "खरं म्हणजे ब्लॅक विडो हे एक प्रतिष्ठित पात्र असून ते एक अतिशय शक्तिशाली आणि निर्भय पात्र आहे. या व्यक्तिरेखेबद्दल जेव्हा मला निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी माहिती पाठवली तेव्हा मी त्या पात्रासोबत जोडू शकले. त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतल्यानंतरच मला त्या पात्राची माहिती कळाली. त्यामुळे मी या व्यक्तिरेखेला लगेच होकार दिला.तेव्हा पासून मी सकारात्मक दृष्टीने काम केले."

Kareena Kapoor
Shehjada Twitter Review: हवा शेहजादाचीच! कार्तिक-क्रितीच्या जोडीवर प्रेक्षक फिदा, चित्रपटावर होतोय कौतुकाचा वर्षाव

करीनाने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. पण ती पहिल्यांदाच डबिंग करत आहे. तिला त्यावेळी अनेकदा आवाजाचा चढ- उतार जाणावला, तेव्हा ती म्हणते, "आता मी सीरिजच्या फायनल शूटिंगसाठी तयार आहे. फायनल टच साठी तयार आहे. बघू आता मी कशाप्रकारे यामध्ये काम करते. थोडं गूढ, थोडं सामर्थ्य आहे ते मी माझ्या भूमिकेत देण्याचा नक्की प्रयत्न करत आहे."

Kareena Kapoor
Raj Kapoor Bungalow SOLD: आर के स्टुडिओनंतर आता राज कपूरचा बंगला ही विकला, वाचा सविस्तर...

करीना 'द वेस्टलँडर्स'ला सांगते की प्रेक्षक महिला अॅक्शन चित्रपट पाहण्यासाठी तयार आहेत. ती पुढे म्हणते, "आपण सर्वच बॉलिवूडमधील अॅक्शनने भरलेले चित्रपट पाहत मोठे झालो आहोत, पण मला वाटते की, अॅक्शन भूमिकांसह विविध भूमिका करणाऱ्या महिला अभिनेत्रींना शोधण्याची वेळ आता आली आहे. मी अद्याप या फॉर्मेटमध्ये फीचर फिल्ममध्ये काम करू शकले नाही. मला स्क्रीनवर गुप्तहेर किंवा एका मारेकरीची भूमिका करायला आवडेल, मला वाटते की, कृती करण्याची वेळ आली आहे, कदाचित मी ते करण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्या दिशेने सुरुवात म्हणून मी 'ब्लॅक विडो'ची भूमिका साकारण्यास उत्सुक आहे."

Kareena Kapoor
Shehjada Film Review: रोमान्स, ॲक्शन अन् कॉमेडी... असा आहे कार्तिकचा शेहजादा

यावेळी करीनाला विचारले की, सर्व सेलिब्रिटींना त्यांच्या लोकप्रियतेनुसार त्यांना ऑडिओ मालिका ऑफर केल्या गेल्या आहेत.त्यावेळी करीना म्हणते, "मला असं वाटतं की, हा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सपेक्षा खूप वेगळा असला तरीही हे फॅड नेहमीप्रमाणेच आहे. पात्रं तेच असतात पण कथा पूर्णपणे वेगळी असते. प्रेक्षक, कोणत्याही वयातले असो, प्रत्येकजण मार्वलचा चाहता आहे, प्रत्येकाला त्यांच्या पात्रांबद्दल माहिती आहे, म्हणून त्याचे भारतीयीकरण करणे आणि ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने सांगणे, ते ही हिंदीमध्ये, त्यामुळे प्रेक्षकांना याकडे अधिकच आकर्षित करतात."

Kareena Kapoor
Disney+ Hotstar Down: गेल्या तासभरापासून हॉटस्टारचे सर्व्हर डाऊन

जेव्हा करीनाला विचारलं की, तिचे मुलं तैमूर आणि जेह देखील सुपरहिरोचे चाहते आहेत आणि त्यांचे पालक लवकरच सुपरहिरोची भूमिका साकारणार आहेत याबद्दल ते उत्साहित आहेत का. तर त्यावर करीना म्हणते, "माझा धाकटा मुलगा 2 वर्षांचा आहे, तो त्यासाठी खूप लहान आहे. पण तैमुर माझ्या भूमिकेसाठी फारच उत्साहीत आहे.तो थोर आणि वूल्व्हरिनमध्ये त्याला जास्त आवड आहे. तो आणि त्याचे वडील नेहमीच चर्चा करत असतात."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com