Jaane Jaan Trailer: करीना कपूर कोणाच्या जाळ्यात अडकणार? सस्पेंस थ्रिलर 'जाने जा'चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

Kareena kapoor OTT Debut: करीना कपूर तिच्या डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाली आहे.
Kareena Kapoor Look In Jaane Jaan
Kareena Kapoor Look In Jaane JaanInstagram @kareenakapoorkhan

Jaane Jaan Trailer Out:

करीना कपूर तिच्या डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. कहाणी, बदला या थ्रिलर चित्रपटांचे दिग्दर्शक सुजॉय घोष 'जाने जा' हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला आले आहेत.

सुजॉय घोष यांच्या 'जाने जा' चित्रपटामध्ये करीना कपूरसह विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील आहेत. नुकताच या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Kareena Kapoor Look In Jaane Jaan
Kareena Kapoor - Kiara Advani: अभिनेत्रीचा तोल गेला अन्... अर्जुन कपूरने सावरलं नसतं तर कियाराचं काही खरं नव्हतं
Kareena Kapoor Look In Jaane Jaan
Jawan Fees: 'जवान'साठी एकट्या शाहरुखनं घेतलं १०० कोटींचं मानधन; या मल्टीस्टारर चित्रपटातील इतर कलाकारांनी घेतली भरभक्कम फी

'जाने जा' चित्रपटामध्ये करीना कपूर एक सिंगल मदर आहे. जयदीप अहलावत तिचा शेजारी आहे तर विजय वर्मा पोलीस ऑफिसर आहे. चित्रपटाची कथा करीना कपूरच्या एक्स हसबंडच्या हत्येभोवती फिरते.

'जाने जा'च्या ट्रेलरची सुरुवात करीना कपूरपासून होते. जी या चित्रपटामध्ये मिसेस डिसोझा हे पात्र साकारत आहे. ती तिचा शेजारी जयदीपपासून एक गुपित लपवत आहे. तर विजय वर्मा एका केसचा तपास करण्यासाठी कलिमपोंग येथे येतो. त्याची संशयीत आरोपी करीना कपूर असते. (Latest Entertainment News)

या चित्रपटाच्या कथेत खूप ट्विस्ट अणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत. कारण करीना कपूर ट्रेलरमध्ये विजय वर्माशी रोमान्स करताना दिसत आहे. तर जयदीप देखील तिच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे. आता या तिघांमध्ये कोण कोणाचा खून करणार? असे रहस्य पाहायला मिळणार आहे.

'जाने जा' चित्रपट २१ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी करीना कपूरचा ४१ वा वाढदिवस आहे. हा चित्रपट केगो हिगाशिनोच्या डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स या सर्वाधिक विक्री झालेल्या जापनीज कादंबरीचे अधिकृत रूपांतर आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com