करीना कपूर साकारणार आतापर्यंतची सर्वात वेगळी भूमिका, अभिनयाशिवाय मोठी जबाबदारीही निभावणार

बहुचर्चित लाल सिंह चड्ढानंतर करीना कपूर तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यग्र आहे.
Kareena Kapoor Khan
Kareena Kapoor Khan Saam Tv

मुंबई: बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' नंतर आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. करिना कपूरचा लाल सिंह चड्ढा या चित्रपटाने (Laal Singh Chadha) बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पाडला नाही. परंतु, चित्रपटातील करिनाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लवकरच करिना एका वेगळ्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Kareena Kapoor Khan
Asha Parekh : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

बहुचर्चित लाल सिंह चड्ढानंतर करीना कपूर तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यग्र आहे. करीनाच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत. माहितीनुसार, चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर केवळ अभिनय नव्हे, तर चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे.

मेहता दिग्दर्शित हा चित्रपट क्राईम थ्रिलर आहे. परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्यापही चित्रपटाच्या शिर्षकाबाबत खुलासा केला नाही. माहितीनुसार चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिकेत असून ती एका गुप्तहेर पोलीस ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट महिलांवरील विषयावर असणार आहे.

Kareena Kapoor Khan
Sahela Re: 'सहेला रे' घेऊन येत आहे एक मखमली नातं; चित्रपट १ऑक्टोबरला होणार रिलीज

करीना कपूर तिच्या आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये व्यग्र आहे. माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये होणार आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटानंतर करीनाला या आगमी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. यामुळेच चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर काय जादू करतो? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com