
Raja Hindustani Kissing Scene:'राजा हिंदुस्तानी' हा करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्या उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटाने करिश्मा कपूरला सुपरस्टार बनवले होते. या चित्रपटाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मग करिश्मा कपूर आणि आमिर खानचा दमदार अभिनय असो किंवा या चित्रपटातील जबरदस्त गाणी. 'राजा हिंदुस्तानी' हा त्या काळातील सर्वात बोल्ड चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटातील एका किसिंग सीनने इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.
'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूरने एका सीनसाठी एक मिनिटापर्यंत किसिंग केले होते. त्या काळात अभिनेत्री असे सीन करणे टाळायच्या, तर करिश्माने एक मिनिटाचा किसिंग सीन सर्वांना चकित केले होते. पडद्यावर हा सीन दिसताना जितका सहज आणि सोपा वाटत होता तितकाच तो शूट करणे कठीण गेले होते.
राजीव मसंद यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत करिश्मा कपूरने या किसिंग सीनविषयी सांगितले होते. शूटिंग करताना करिश्मा आणि आमिर खानची प्रकृती बिघडली होती. 1 मिनिटाचा सीन शूट करण्यापूर्वी दोघेही खूप घाबरले होते. चित्रपटाचा हा प्रसिद्ध सीन फेब्रुवारी महिन्यात उटी येथे शूट करण्यात आला होता.
त्यादरम्यान उटीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त थंडी होती. कडाक्याची थंडी, वेगाने वाहणारा थंड वारा आणि गोठवणारे थंड पाणी या सगळ्या वातावरणात या जोडीला हा सीन शूट करायचा होता. हा सीन शूट करण्यासाठी 3 दिवस लागले आणि जवळपास 47 रिटेक घ्यावे लागले. दरम्यान आमिर खान आणि करिश्मा कपूर दोघांनाही वाटत होते की या सीनचे शूटिंग लवकरात लवकर संपावे.
3 दिवसांच्या मेहनतीनंतर जेव्हा दिग्दर्शकाला समाधानकारक सीन मिळाला तेव्हा आमिर आणि करिश्माच्या आनंदाला पारावार उरला नाही. करिश्मा आणि आमिर सकाळी ७ ते संध्याकाळी ६पर्यंत शूटिंग करायचे. करिश्मा म्हणते की, 'त्या काळात अशा कठीण परिस्थितीत चित्रपटाचे शूटिंग करणे हा एक वेगळा अनुभव होता.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.