Akshay Khanna Birthday: आई ठरली प्रेमकहाणीतली व्हिलन..! या अभिनेत्रीच्या आईने केला अपमान आणि अक्षय खन्नाचं ठरलेलं लग्न मोडलं

Akshay Khanna Love Story: अक्षय खन्नाने अद्याप लग्न केलेले नाही.
Akshay Khanna Birthday Special
Akshay Khanna Birthday SpecialInstagram

Akshay Khanna Property: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाच आज वाढदिवस आहे. अक्षय ४८ वर्षाचा झाला आहे. अक्षय दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा आहे. अभिनेत्याने मुंबईतील बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले, त्यानंतर त्याने 11वी आणि 12वी इयत्तेसाठी उटी येथील लॉरेन्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला.

अक्षयने 'रेस', 'दिल चाहता है', 'हंगामा', 'ताल' आणि 'हलचल', 'सेक्शन 375' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता नुकताच 'दृश्यम 2' मध्ये दिसला होता. अक्षय खन्नाने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कार जिंकले आहेत. त्यांच्या वाढदिवशी त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी.

Akshay Khanna Birthday Special
Ajay Devgn Movie: हिट चित्रपट देणाऱ्या अजयचा रखडलेला 'मैदान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

इंडस्ट्रीत यशस्वी कारकीर्द असूनही अक्षय खन्नाने अद्याप लग्न केलेले नाही. या अभिनेत्याचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले तरी त्यांचे कोणाशीही नाते फार काळ टिकू शकले नाही. बॉलिवूडच्या भाईजानप्रमाणे अक्षय अजूनही सिंगल आहे. त्याचे अजून लग्न झालेले नाही. अक्षयचे लग्न बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध कुटुंबात म्हणजेच कपूर कुटुंबात होणार होते.

रणधीर कपूर यांना मुलगी करिश्मा कपूरचे लग्न अक्षय खन्नाशी करायचे होते. त्यासाठी रणधीर यांनी अक्षयच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. सगळं जुळून आलं होतं. अक्षय आणि करिष्मा एकमेकांना पसंत होते.

मात्र नंतर करिश्माची आई बबिता यांनी या नात्याला नकार दिला. एका मीडिया रिपोर्टनुसार, काही वर्षांपूर्वी अक्षय म्हणाला होता की, तो लग्नाचे मटेरियल आहे असे त्याला वाटत नाही. तसेच अक्षयने त्याच्या आयुष्यावर कोणी कंट्रोल करू नये असे त्याला वाटते.

अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. अक्षयच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे 20 दशलक्ष डॉलर म्हणजेच 148 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अक्षयकडे मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे, जिथे तो राहतो. इतकंच नाही तर अक्षयच्या नावावर पुणे आणि दिल्लीसारख्या शहरातही प्रॉपर्टी आहे. अक्षयकडे ऑडी, बीएमडब्ल्यू आणि होंडा सीआर-व्हीसह अशा अनेक गाड्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com