Kartik Aryan: उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, कार्तिकला सिंगल राहणं जमेना...

कार्तिक आर्यन लग्न बंधानात अडकणार असल्याचे संकेत त्याने स्वत:चं दिले आहेत.
Kartik Aryan Wedding
Kartik Aryan WeddingInstagram

Kartik Aryan Wedding: सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना लगीन घाई लागली आहे. आधी आलिया नंतर आथिया त्यानंतर कियारा आणि नुकतच चंकी पाडेच्या मुलीचंही लग्न उकरलं. लवकरच क्रिती सेनन आणि तमन्ना लग्नाच्या बोहल्यावर चढणार या बातम्यांना बरंच उधाण आलं आहे. मात्र आता अशातच लवकर बॉलिवुडचा चॉकलेट हिरो म्हणजेच कार्तिक आर्यनही लग्न बंधानात अडकणार असल्याचे संकेत त्याने स्वत:चं दिले आहेत.

Kartik Aryan Wedding
Box Office Collection: कपिल शर्मा की राणी मुखर्जी? कोणाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यनची बरीच हवा आहे. आधी चित्रपटांमुळे तर आता गर्लफ्रेंमुळे त्याची चर्चा होते. 'भूल भुलैया 2' सुपरहिट ठरल्यानंतर कार्तिकचं नशीब चांगलचं बदलून गेलं आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात.

आता बॉलिवुडमधील सगळे कलाकार सिंगलपासून मिंगल होत असल्याने कार्तिकलाही राहवत नाही आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये कार्तिक झी सिने अवॉर्डच्या मंचावर ढोल-ताशाच्या वादनात ग्रँड एंट्री करताना दिसला.

या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओत कार्तिक म्हणतो, 'बघा, बॉलिवूडमध्ये एकामागून एक सर्वांचेच बँड वाजत आहेत, सर्व घोड्यावर चढत आहेत, सर्वांचेच विकेट पडत आहेत. पण अद्याप माझी एक ही विकेट पडली नाही. ऐलेजिबल सिंगल क्लबमध्ये कोण उरले आहे? अर्थात मीच, पण आता हवामान बदलत आहे, हा सक्त माणूसही वितळत आहे. लग्नाचे लाडू खाऊन पहावे असं वाटतं आहे.

Kartik Aryan Wedding
Kangana Ranaut: बाबो...! कधी दगडांच्या मागे कपडे बदलणाऱ्या कंगनाकडे आज आहे ६५ लाखांची व्हॅनिटी

मी प्यार का पंचनामा तर केला आहे, आता लग्नाचाही पंचनामा करतो. त्यामुळे या स्टेजवर तुम्हा सर्वांना साक्षीदार मानून आज मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला ही बातमी देऊ इच्छिते की मी लग्न करणार आहे. असं म्हणतं त्याने त्याच्या लग्नाची जाहिरपणे घोषणा केली आहे.

त्याच्या या पंचवर बसलेले सर्व ऑडियन्स जोरजोरात हसु लागतात. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असुन चाहतेही त्याच्या या निर्णयावर खुप आंनदित आहे. ते देखील या क्षणाची खुप आतुरतेने वाट पहात असल्याचं बोलत आहेत. तर काहींनी कार्तिकला क्रिती सेननसोबत लग्न करण्याचा सल्लाही दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com