
Shehzada Movie Box Office Collection: कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांचा 'शेहजादा' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस पहिल्या दिवशी काय कमल केली आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील. परंतु 'पठान' चित्रपट आजही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे आणि याच परिणाम 'शेहजादा' चित्रपटावर नक्कीच होईल असे म्हटले आजच्या आहे.
'भूल भुलैया' चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक आर्यनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'शेहजादा'कडून अनेकांना भरपूर अपेक्षा होत्या. परंतु चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात खूपच संथ झाली.
चित्रपटाचे एकूण बजेट ८५ कोटी रुपये आहे, असे म्हटले जात आहे. सुरुवातीला मिळालेल्या आकड्यांनुसार चित्रपटाने काल म्हणजे पहिल्या दिवशी 6.50 कोटी ते 7.25 कोटी कमाई केली आहे. शेहजादासाठी सर्वोत्तम फेरिंग सेंटर दिल्ली होते, त्यानंतर मुंबई होते.
पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन नॅशनल चैनला पहिल्या दिवशी अंदाजे 3.60 कोटी, तर नॉन-नॅशनल चेनने 3.25 कोटी रुपयांची कामे केली आहे. बाय वन गेट वन फ्री ऑफरमुळे ओपनिंग डे याचा फायदा झाला. तिकिटांची अधिक विक्री व्हावी यासाठी कार्तिक आर्यन आणि भूषण कुमार यांच्या मार्केटिंग ब्रेनचा शेवटच्या क्षणाचा हा मास्टर स्ट्रोक होता.
आज शनिवार आहे तसेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुट्टी आहे. त्यामुळे याचा 'शेहजादा' चित्रपटाला नफा कमाविण्यासाठी होऊ शकतो. 'शेहजादा'ची ओपनिंग भेडिया, एक व्हिलन रिटर्न्स सारखीच आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.