Kartik Aaryan: चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन-पश्मिना रोशन रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्याने सोडले मौन

कार्तिक आर्यन पश्मिना रोशनला डेट करत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.
Kartik Aaryan on his Relationship with Pashmina Roshan
Kartik Aaryan on his Relationship with Pashmina RoshanSaam Tv

Kartik Aaryan News: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या प्रोफेशनल लाईफसह त्याच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सारा अली खान हिच्यासह त्याचे नाव जोडले जात होते. परंतु आता त्याचे नाव अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनसोबत जोडले जात आहे.

Kartik Aaryan on his Relationship with Pashmina Roshan
Vikram Gokhale : रंगभूमीवरील 'बॅरिस्टर'; विक्रम गोखलेंचा जीवनप्रवास

कार्तिक आर्यन पश्मिना रोशनला डेट करत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. आता कार्तिक आर्यनने या बातमीवर मौन सोडले आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान कार्तिक आर्यन म्हणाला, 'मला आता समजले आहे की मी एक सेलिब्रिटी आहे आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची चर्चा होणार. जर कोणाशी मैत्री असेल तर त्यालाही नात्याचे नाव दिले जाईल. अशा गोष्टींमुळे कधी कधी दोन व्यक्तींना त्रास होतो आणि त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता मी माझे मन घट्ट केले आहे. जेणेकरून मला या गोष्टींचा काहीही फरक पडणार नाही आणि मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकेन. (Celebrity)

यानंतर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर त्याच्याबद्दल होत असलेल्या बातम्यांबद्दल सांगितले. कार्तिक आर्यन म्हणाला, 'जेव्हा माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या जातात, विशेषत: जेव्हा तसे नसते तेव्हा मला मनापासून वाईट वाटते. मी आता स्वत: गोष्टींशी जुळवून घ्यायला शिकलो आहे, कारण मला माहित आहे की फिल्म स्टारच्या आयुष्यात खासगी काहीही नसते. आता मला हे सर्व माहीत आहे.' (Social Media)

कार्तिक आर्यन अलाया एफसोबत 'फ्रेडी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो वेगळ्या अवतारात दिसणार आहे. निष्पाप चेहऱ्यामागील एक वेगळी बाजू आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर २ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक 'शहजादा'मध्ये क्रिती सेनॉनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. (Movie)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com