Kartik Aaryan At Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला अन् भक्तांच्या गराड्यात अडकला

Kartik Aaryan: अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतेच लालबागचा राजाचे दर्शन घेतले आहे.
Kartik Aaryan Visited Lalbaugcha Raja
Kartik Aaryan Visited Lalbaugcha RajaSaam TV

Ganesh Chaturthi Celebrations Of Kartik Aaryan:

देशभरात सध्या गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार देखील गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. तर काही कलाकार गणपतीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले आहेत.

अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतेच लालबागचा राजाचे दर्शन घेतले आहे. गाडीतून बाहेर येताच कार्तिक आर्यनला चाहत्यांनी घेरलं आणि त्याला बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना अडचण झाली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Kartik Aaryan Visited Lalbaugcha Raja
Jawan At Oscars: 'जवान' जाणार ऑस्करला? दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी व्यक्त केली इच्छा

आज गणेश चतुर्थीनिमित्त अभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. परंतु तो गाडीतून बाहेर येताच बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी त्याला घेरलं. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी एकच गर्दी केली.

गर्दी इतकी झाली होती की कार्तिकला हलता देखील येत नव्हतं. सुरक्षारक्षकांच्या मदतीने कार्तिक लालबाच्या राजापर्यंत पोहोचला. कार्तिक आर्यनने लालबाग राजाच्या चरणी डोकं टेकलं आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होता आहे.

कार्तिक आर्यनने बाप्पाच्या दर्शनावेळी पीच रंगाचा सदरा आणि सफेद पायजमा घातला होता. तसेच त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल घातली होती.

कार्तिक आर्यन 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये दिसला होता. आता तो चंदू चॅम्पियन या चित्रपटामध्ये एका फुटबॉलरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून चित्रपटातील कार्तिक आर्यनचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com