
Kartik Aryan Injured: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या पायाला लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान गंभीर दुखापत झाली होती. अभिनेता एका कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्स करत असताना, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, “कार्तिकने इतके दिवस हे गुपित ठेवले हे आश्चर्यकारक आहे. स्टेजवर त्याच्यासोबत जे काही घडलं, ती छोटी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वच घाबरले होते.”
मिळालेल्या माहितीनुसार, “कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया २’मधील गाण्याची तो स्टेजवर सिग्नेचर स्टेप करत होता, तेव्हा त्या स्टेप करताना त्याच्या पायाला दुखापत झाली. अभिनेत्याच्या पायाला इतकी दुखापत झाली होती की, स्टेजवर त्याचा पाय सरळही होत नव्हता. पण, त्यावेळी कार्तिक विनोद करत असल्याचे सर्वांना वाटले. मात्र जेव्हा प्रकरण गंभीर होऊ लागले तेव्हा त्याची दुखापत पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.”
कार्तिकच्या पायाला जखम झाल्यानंतर सुमारे 20-30 मिनिटे स्टेजवरुन तो खाली उतरलाच नाही. परंतु त्यानंतर कोणतीही वैद्यकीय मदत त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यानंतर जेव्हा तो स्टेजवरून उतरला, तेव्हा वैद्यकीय पथक आणि फिजिओ-थेरपिस्टने त्याच्या पायाची घोट्याची तपासणी केली. त्यानंतर त्याला दुखण्यापासून आराम मिळाला.
लगेचच कार्तिकला व्हॅनिटी कारमध्ये नेण्यात आले. त्याच्या पायाची अवस्था पाहून सर्वच जण घाबरलेले होते. कार्तिकला कामाची खूप आवड आहे. त्यामुळेच तो या दुखापतीतून पटकन बरा झाला आणि लगेचच चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार झाला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.