
दिल्ली - प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. बिरजू महाराज यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचा नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. (Pandit Birju Maharaj Passes Away)
बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ (Lucknow) येथे झाला होता. दिल्लीतील (Delhi) राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील साकेत रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केले. याशिवाय सत्यजित राय यांच्या 'शतरंज के खिलाडी' या चित्रपटातही त्यांनी संगीत दिले होते.
बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. 2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2016 मध्ये बाजीराव मस्तानीच्या 'मोहे रंग दो लाल' या गाण्याला नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.