Katrina Post : कतरिना कैफचा पती विकी कौशलसोबत रोमँटिक मूव्हमेंट, फोटो व्हायरल

कतरिना कैफने आणि विकी कौशलसोबत एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे.
Vicky Kaushal and Katrina Kaif
Vicky Kaushal and Katrina Kaif Saam Tv

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल(vicky kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा(Katrina Kaif) चाहता वर्ग खूप मोठा आहे. चाहते या कपलला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. त्याच वेळी, दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या रोमँटिक क्षणाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.

Vicky Kaushal and Katrina Kaif
Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस १६ मध्ये सहभागी होणार? पोस्ट शेअर करत दिली माहिती

कतरिना कैफने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. समोर आलेल्या फोटोत दोघेही त्यांच्या बाल्कनीत समुद्राकडे तोंड करून उभे आहेत आणि एकमेकांचा हात हातात धरून फोटो काढत आहेत. दोघेही मावळत्या सूर्यासोबत एका सुंदर संध्याकाळचा आनंद घेत आहेत. अगदी कोणत्याही कॅप्शनशिवाय, फक्त हा फोटो दोघांच्या या खास क्षणाचे सौंदर्य दाखवत आहे.

Vicky Kaushal and Katrina Kaif
Oscar Award 2023: पुरस्कारासाठी चर्चा एकाची, पुरस्कार भलताच घेऊन गेला…

अलीकडेच कतरिना कैफ आणि विकी कौशल 'कॉफी विथ करण'च्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून दिसले होते. यादरम्यान कतरिनाने सांगितले होते की, ती पहिल्यांदा झोया अख्तरच्या पार्टीत विकीला भेटली होती. पहिल्या भेटीपासूनच विकी तिला आवडू लागला होता. कतरिनाने याबद्दल झोया अख्तरला सांगितले होते.

कतरिना-विकीचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. या कपलने एका अॅड शूट एकत्र केले आह. ज्याच्या फोटोशूटची झलक व्हायरल होत आहे. यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर कतरिना 'टायगर 3' आणि हॉरर कॉमेडी 'फोन भूत'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, विकी 'गोविंदा नाम मेरा', 'साम बहादूर' आणि 'द अमर अश्वथामा' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com