KBC 13 | 'या' प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर जिंकले असते ७ कोटी, पहा कोणता 'तो' प्रश्न

KBC च्या १३ व्या सीजनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न तब्बल सात कोटी रुपयांसाठी होता. पहा तो नक्की कोणता प्रश्न आहे.
KBC 13 | 'या' प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर जिंकले असते ७ कोटी, पहा कोणता 'तो' प्रश्न
KBC 13 | 'या' प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर जिंकले असते ७ कोटी, पहा कोणता 'तो' प्रश्नSony Tv

KBC अर्थात कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय रिअॅलिटी शो चा १३ वा सिजन सुरु झाला आहे. या सिजनच्या दुसऱ्याच आठवड्यात हिमानी बुंदेल या महिला स्पर्धक करोडपती झाल्या आहेत. आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी एक कोटी रुपये जिंकले मात्र सात कोटींसाठी असलेल्या प्रश्नाचे ते उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे गेम क्वीट करत त्यांनी एक कोटी रक्कम आपल्या नावावर केली. सोबतच त्यांना ह्युंदाईची ऑरा ही कारही भेट देण्यात आली. या गाडीची किमान किंमत ५ लाख ९७ हजार इतकी आहे. तर सात कोटींसाठी असा कोणता प्रश्न होता ज्याचं उत्तर हिमानी यांना देता आलं नाही असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... (KBC 13 | If 'this' question had been answered, 7 crore would have been won, see which 'it' question)

हे देखील पहा -

तर अगोदर एक कोटींसाठी विचारलेला प्रश्न पाहुयात

एक कोटींसाठी हिमानी यांना असा प्रश्न विचारला गेला की, ''दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्समध्ये ब्रिटनची हेर म्हणून काम करताना नूर इनायत खान हीने कोणतं टोपणनाव वापरलं होतं?''

A) वेरा एटकिस

B) क्रिस्टीना स्कारबेक

C) जुलीएन आईस्त्रर

D) जीन-मेरी रेनियर

या प्रश्नाला वरील चार पर्याय देण्यात आले होते. हिमानी यांनी बराच वेळ घेत कोणतीही लाईफलाईन न घेता या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन D - जीन-मेरी रेनियर असं दिलं. जे की बरोबर उत्तर होतं. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिल्यानं हिमानी १ कोटी जिंकणाऱ्या KBC सीजन १३ च्या पहिल्या करोडपती ठरल्या. त्यानंतर त्यांना ७ कोटींसाठी एक प्रश्न विचारण्यात आला मात्र या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहित नव्हतं. बराच वेळ विचार केल्यानंतर एक कोटींवरुन थेट ३ लाख २० हजारांवर येण्याऐवजी आपण शो क्वीट करण्याचा निर्णय हिमानी यांनी घेतला. तर सात कोटींसाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल होता. तो प्रश्न असा होता की,

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं? ज्यासाठी त्यांना १९२३ साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली?

A) द वॉण्ट्स अ‍ॅण्ड मीन्स ऑफ इंडिया

B) द प्रॉब्लेम ऑफ द रुपी

C) नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया

D) द लॉ अ‍ॅण्ड लॉयर्स

या प्रश्नाचं उत्तर होतं B - द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. ह्याच प्रश्नाचं हिमानी यांना उत्तर देता आलं नाही त्यामुळे त्यांनी गेम क्वीट करत एक कोटी रुपयांची रक्कम आपल्या नावावर केली.प

KBC 13 | 'या' प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर जिंकले असते ७ कोटी, पहा कोणता 'तो' प्रश्न
New Rules from 1st September : आजपासून आर्थिक व्यवहार आणि नियमांत बदल

द प्रॉब्लेम ऑफ द रुपी

द प्रॉब्लम् ऑफ द रूपी : इट्स ओरिजिन ॲन्ड इट्स सोल्युशन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध आहे. तो त्यांनी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर आफ सायन्स (डी.एस.सी.) च्या पदवीसाठी प्रस्तुत केला होता. हा प्रबंध डिसेंबर, १९२३ मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित झाला. या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे की, मुद्रा समस्याच्या अंतिम निर्णयात, कशा प्रकारे ब्रिटिश शासकांनी भारतीय रुपयाच्या किंमतीला पाऊंडसोबत जोडून आपला जास्तीत-जास्त फायदा होण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या या हेराफेरीनेच भारतीय नागरिकांना गंभीर आर्थिक समस्येत लोटले गेले. ब्रिटिश शासकांच्या या निर्णयामुळे, भारतीय धन हे ब्रिटिश खजिन्यांच्या दिशेने निरंतर वळवले गेले. या व अशा अनेक प्रकारे भारतातली संपत्ती ब्रिटिश सरकारच्या व ब्रिटिश जनतेच्या फायद्यात जात राहिली.

स्त्रोत: विकिपीडिया

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com