Maharashtra Shaheer Song Released: १५ दिवसांनी 'महाराष्ट्र शाहीर'मधील 'हे पावलायं देव माझा मल्हारी' नवं गाणं प्रदर्शित

Ajay-Atul New Song: 'हे पावलायं देव माझा मल्हारी' गाणं आहे अतुल गोगावलेने गायले आहे.
Hey Pawlay Dev Majha Malhari Song Maharashtra Shaheer Released
Hey Pawlay Dev Majha Malhari Song Maharashtra Shaheer ReleasedSaam TV

Kedar Shinde Share New Song In Maharashtra Shaheer: शाहीर साबळे यांच्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट २८ एप्रिल २०३ रोजी प्रदर्शित झाला. महाराष्ट्रात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील गाण्यांची विशेष चर्चा झाली. चित्रपटाप्रमाणे चित्रपटातील गाणी देखील खूप गाजत आहेत. अशातच आता चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. खुद्द केदार शिंदे यांनी पोस्ट करत ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोचवली आहे.

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट प्रदर्शित होऊन १५ दिवस झाले आहे. असे असताना आता १५ दिवसांनी चित्रपटातील नवीन गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'हे पावलायं देव माझा मल्हारी' हे 'महाराष्ट्र शाहीर'मधील नवीन गाणं प्रदर्शित झाले आहे. केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत गाण्याचे पोस्टर शेअर केलं आहे. (Latest Entertainmnet News)

Hey Pawlay Dev Majha Malhari Song Maharashtra Shaheer Released
Prasad Oak: धर्मवीरनंतर प्रसाद ओक साकारणार भारदस्त पात्र; बाबासाहेबांच्या ‘परिनिर्वाण’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका...

केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्ट्मधेय लिहिले आहे, श्री खंडेरायाच्या आशीर्वादाने सादर करत आहोत अतुल गोगावलेंच्या दमदार आवाजातलं, लोकांच्या मनातलं गाणं 'हे पावलायं देव माझा मल्हारी'. एवरेस्ट मराठीच्या युट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. एवढ्या २ तासात या गाण्याला ५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

'हे पावलायं देव माझा मल्हारी' या गाण्यात महाराष्ट्राची लोकधाराचा संपूर्ण प्रवास दाखवला आहे. शाहीर साबळे यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली. या शोने अनेक कलाकार घडवले. शाहीरांच्या छत्रछायेखाली 'महाराष्ट्राची लोकधारा'मध्ये अनेक कलाकार घडले. त्यावर आधारित हे गाणे आहे अतुल गोगावलेने गायले आहे.

या गाण्यात अंकुश चौधरी, सना शिंदे, अश्विनी महांगडे, शुभांगी सदावर्ते, निर्मिती सावंत, मृन्मयी देशपांडे, दुष्यंत वाघ, देवा, अतुल काळे, अमित डोलावत आहेत. या गाण्याशी तुम्ही लगेच कनेक्ट व्हाल. 'हे पावलायं देव माझा मल्हारी' हे गाणे खूप सुंदर आहे. गाण्यातून महाराष्ट्राची लोकधाराची कथा देखील अप्रतिम पद्धतीने मांडली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com