Baipan Bhari Deva New Song: महालक्ष्मी मंदिरात झाले 'बाईपण भारी देवा'चे शीर्षक गीत प्रदर्शित ; स्त्री शक्ती होणार जागर

Kedar Shinde News Movie : 'बाईपण भारी देवा' ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Baipan Bhari Deva Title Track Out
Baipan Bhari Deva Title Track Out Saam TV

Baipan Bhari Deva Title Track Out : महाराष्ट्र शाहीरनंतर केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चर्चा आहे. ३० जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे टायटल ट्रक नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र शाहीरनंतर केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चर्चा आहे. ३० जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे टायटल ट्रक नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Latest Entertainment News)

Baipan Bhari Deva Title Track Out
Swara Bhaskar Pregnancy: कुणीतरी येणार गं! स्वरा-फहादच्या घरी पाळणा हलणार

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं टायटल सॉंग मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत लॉंच करण्यात आलं. या गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे,अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि संगीतकार साई-पियुष उपस्थित होते.

'बाईपण भारी देवा' हे गाणे साईप्रसाद निंबाळकर यांनी गायलं आहे. साई-पियुष यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. वलय मुळगुंड यांनी हे गाणे लिहिले आहे.

'बाईपण भारी देवा' चित्रपटातील या शीर्षक गीतावर रिलीज आधीच लोकांनी ठेका धरलेला पहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर तर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच या गाण्याच्या चालीवर रील्स करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे निश्चितच हे गाणे प्रेक्षकांच्या आणि नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जगायला शिकवणार हे नक्की. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल तुम्हाला लवकरच अनुभवयाला मिळणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अश्या मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. 'बाईपण भारी देवा' आता प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com