
Yash Refuses Pan Masala endorsement: चित्रपट कलाकारांना प्रेक्षकांकडून जितके जास्त प्रेम मिळते, तितकीच जबाबदारी त्यांच्यावर येते. चित्रपट कलाकारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न चाहते करत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांचे लक्ष असते. मोठमोठ्या ब्रॅण्ड्स चित्रपट कलाकारांना आपले ब्रँड अम्बॅसेडर बनवतात जेणेकरून त्यांना पाहून इतर लोकही ती त्या वस्तूकडे आकर्षित होतील. अलीकडेच अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीशी हातमिळवणी केली होती. तेव्हा त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला, आपल्या चाहत्यांची निराशा होताना पाहून अक्षयने शेवटी माफी मागितली. याचप्रकारे मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, KGF स्टार यश म्हणजेच रॉकी भाईने पान मसाला (Paan Masala) जाहिरातीची ऑफर नाकारली आहे.
होय! साऊथ स्टारने पुन्हा एकदा करोडोंची ऑफर नाकारली आहे. असे म्हण्टले जात आहे की, कदाचित यशने अक्षय कुमारच्या चुकीपासून हा निर्णय घेतला असेल. त्याला माहित आहे की, चाहत्यांचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. (Yash Rejects Pan Masala Endorsement)
साऊथचा मेगास्टार यशने पान मसाला ब्रँडचे एंडोर्समेंट करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यशच्या टीमने दुजोरा दिला आहे. या निर्णयामुळे रॉकी भाईने चाहत्यांचे मन जिंकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया आणि मोठ्या पडद्यावर फक्त आणि फक्त रॉकी भाईचीच चर्चा आहे. या बातमीने रॉकी भाईची लोकप्रियता आणखी वाढली आहे. दक्षिणेतील यशच नाही तर पुष्पा स्टार अल्लू अर्जुननेही त्याच्या चाहत्यांसाठी करोडो रुपयांच्या पान मसालाची ऑफर नाकारली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.