
Khatron Ke Khiladi 13 Contestant: चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा लवकरच 'खतरों के खिलाडी' हा रिॲलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी पर्यंत हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार अद्याप हे गुलदस्त्यात असून या शो मध्ये कोणकोणते कलाकार असणार याची सध्या जोरात चर्चा आहे.
'बिग बॉस'च्या शोमधील ७ स्पर्धक 'खतरों के खिलाडी १३'मध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शोमध्ये कोणकोणते कलाकार असणार याची संभाव्य यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'खतरों के खिलाडी' या रिॲलिटी शोच्या 13व्या सीझनमध्ये यावेळी पुन्हा एकदा स्पर्धक धोकादायक स्टंट करताना दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या स्पर्धकाचे नाव म्हणजे उर्फी जावेद. ती ही 'खतरों के खिलाडी १३'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी उर्फीसोबत संपर्क साधला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. लवकरच ती दिसण्याची शक्यता आहे.
'बडे अच्छे लगते है'फेम राम म्हणजेच नकुल मेहता आणि दिशा परमार म्हणजेच प्रिया 'खतरों के खिलाडी १३' मध्ये सहभागी होऊ शकते. नुकतेच या जोडप्याने 'बडे अच्छे लगते है' शोचा निरोप घेतला.
रोहित शेट्टीने शालीन भानोतला 'बिग बॉस १६' मधील 'खतरों के खिलाडी १३' मध्ये सहभागी होण्याची संधी दिली. मात्र, शालीनने त्याची ऑफर नाकारली. आता तो त्याचा भाग आहे की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोबतच, सुंबुल तौकीर खान, प्रियांका चाहर चौधरी आणि अंकित गुप्ता यांनाही शो ऑफर करण्यात आला आहे. तथापि, हे मंडळी या शो चा भाग असतील की नाही याबद्दल काहीही निश्चित केलेले नाही.
बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरेलाही 'खतरों के खिलाडी १३' मध्ये सहभागी व्हायचे आहे. या शोमध्ये जाण्याची इच्छा त्याने अनेकदा व्यक्त केली आहे. त्याचवेळी कॉमेडियन मुनावर फारुकीचे नावही समोर येत आहे, जो या शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा यांच्याबद्दलही सांगितले जात आहे की, त्यांच्या सोबतही निर्मात्यांनी संपर्क साधला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.