Khupte Tithe Gupte: 'उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी अजित पवार की देवेंद्र फडणवीस?', सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं...

Supriya Sule In Khupte Tithe Gupte Show: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये हजेरी लावली.
Khupte Tithe Gupte
Khupte Tithe GupteSaam Tv

Supriya Sule On Ajit Pawar:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे सुप्रिया सुळे या खूपच नाराज झाल्या आहेत. असे असले तरी देखील त्यांचे भावाप्रतीचे प्रेम काही कमी झाले नाही.

अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील सुप्रिया सुळे यांचा आणखी एक प्रमो समोर आला आहे. यामध्ये त्या अजित पवार यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत.

Khupte Tithe Gupte
Tharala Tar Mag Serial: मेकअपची कमाल की खरीखुरी घटना; शिल्पा नवलकरचा व्हिडीओ पाहून प्रेक्षक बुचकळ्यात

'खुपते तिथे गुप्ते' शोमधील सुप्रिया सुळेंचे अनेक प्रोमा आऊट झाले आहेत. याचदरम्यान, सुप्रिया सुळे या मुलाखतीमध्ये दादा म्हणजेत अजित पवार यांच्याबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये आता या शोचा आणखी एक प्रोमो आऊट झाला आहे.

यामध्ये अवधुत गुप्तेने सुप्रिया सुळेंना 'उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रवावी अजित पवार की देवेंद्र फडणवीस?', असा प्रश्न विचारला. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी उत्तर देताना सांगितले की, 'ऑलवेज अजित पवार' सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हेच सर्वांत जास्त प्रभावी असल्याचे स्पष्टपणे सांगितलं आहे.

याच प्रोमोमध्ये अवधुत गुप्ते हे सुप्रिया सुळे यांना आणखी एक कठीण प्रश्न विचारतो. 'कोणत्या पुतण्याचे आपल्या काकांविरोधातील बंड योग्य होते असे वाटते? यावर अवधूत गुप्ते सुप्रिया सुळे यांना राज ठाकरे, धनंजय मुंडे, अजित पवार असे पर्याय देतो. आता यावर सुप्रिया सुळे नेमकं काय उत्तर देणं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हे उत्तर तुम्हाला येत्या १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

Khupte Tithe Gupte
Jawan 7th Day Collection: सलग तिसऱ्या दिवशी ‘जवान’ची कमाई घसरली, आतापर्यंत जमा केला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com