Kiara Advani: कियारा अडवाणीच्या 'बिजली'चा कडकडाट, डान्समधील सुंदर अदांनी जिंकलं चाहत्यांचं मन

कियाराने नुकताच 'बिजली' या गाण्यातील लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
Kiara Advani looks in her upcoming movie
Kiara Advani looks in her upcoming movieInstagram @kiaraaliaadvani

Kiara Advani New Look: विकी कौशलचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गोविंदा नाम मेरा' असे या चित्रपटाचे नाव असून धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर विकीच्या पत्नीची भूमिका साकारत असून कियारा अडवाणी या चित्रपटात विकीची मैत्रीण आहे.

'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून कलाकारांनी चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. नुकताच कियाराने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. बोल्ड ड्रेसमधील कियाराच्या सेक्सी डान्स मूव्ह्स लोकांना वेड लावत आहेत.

Kiara Advani looks in her upcoming movie
Hansika Motwani: 'ब्लेस मी विथ बेस्ट' म्हणत अभिनेत्री हंसिका मोटवानीने शेअर केला बॅचलरेट पार्टीचा व्हिडिओ

कियाराच्या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात कियारा अडवाणीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. या गाण्यावर अभिनेत्री तिच्या हॉट डान्स मूव्ह करताना दिसत आहे. 'बिजली' असे या गाण्याचे नाव असून कियारालाही सगळ्यांनी हेच नाव दिले आहे. (Movie)

कियाराने नुकताच 'बिजली' या गाण्यातील लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कपाळावर टिकली, डिपनेक ब्लाउस आणि धोती घातलेला कियाराचा लूक खूपच हटके दिसत होता. कियाराच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. हार्ट आणि फायर ईमोजी शेअर करून चाहते कियाराची तारीफ करत आहेत. (Celebrity)

कियारा आणि विकीचे हे गाणे फारच भन्नाट आहे. यामध्ये विकी 'टपोरी' लूकमध्ये दिसत असून कियाराने तिच्या एन्ट्रीने सर्वांना मोहून टाकले आहे. कियारा आणि विकीचा हा चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com