Sidharth Kiara Reception: लग्न झालं आता रिसेप्शन पार्टी कधी?; जाणून घ्या सर्व अपडेट्स

मुंबईतील सेंट रेगिस या ५ स्टार हॉटेलमध्ये ते पार्टी देणार आहेत.
Sidharth Kiara Reception
Sidharth Kiara ReceptionSaam TV

Sidharth Kiara Reception: बॉलिवूड बेस्ट कपल कियारा आणि सिद्धार्थ यांनी लग्न गाठ बांधली आहे. काल सुर्यगढ या भव्य रिसॉर्टवर त्यांचा शुभ विवाह पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो समोर आले आहेत. दोघेही लग्नात कमालीचे सुंदर दिसत होते. लग्नानंतर आता या दोघांच्या रिसेप्शन पार्टीची चर्चा सुरू आहे. (Latest Sidharth Kiara Reception Party Update)

कियारा आणि सिद्धार्थ या दोघांनी ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या सुर्यगढ या भव्य रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरूवात केली. रात्री उशिरा सर्व समारंभ पार पडल्यावर हे दोघे दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमध्येच दोघांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे.

आज म्हणजेच ८ फ्रेबुवारीला कियारा तिच्या पतीच्या घरी म्हणजेच सासरी गृहप्रवेश करणार आहे. त्यानंतर सिद्धार्थ आणि कियारा ९ तारखेला पार्टी देऊ शकतात.

चित्रपटातील मित्रांसाठी कधी आहे पार्टी?

दिल्लीमधील सर्व कार्यक्रम झाल्यावर १० फ्रेब्रुवारी रोजी सिद्धार्थ आणि कियारा मुंबईमध्ये परतणार आहेत. त्यानंतर १२ फ्रेब्रुवारीला आणखी एक रिसेप्शन पार्टी दिली जाईल. बॉलिवूडमधील सर्व कलाकार आणि मित्रांसाठी सीड कियारा मुंबईमध्ये देखील एक रिसेप्शन पार्टी आयोजित करतील. मुंबईतील सेंट रेगिस या ५ स्टार हॉटेलमध्ये ते पार्टी देणार आहेत.

Sidharth Kiara Reception
Kiara Advani: वेस्टर्न लूकमधली कियारा एथनिक लूकमध्ये 'अशी' दिसतेय, पाहा फोटो

बॉलिवूडचं हे फेव्हरेट कपल ४ फेब्रुवारीलाच सूर्यगढ रिसॉर्टवर पोहचले होते. इथे आल्यावर ५ तारखेला त्यांनी प्री विडिंग शूट केलं होतं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते तसेच मित्रमंडळींनी सीड कियाराच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com