सलमान खानच्या ‘Kick 2’ची सोशल मीडियावर हवा, चित्रपटातील लूकपाहून चाहत्यांनी लढवले अक्कलेचे तारे

सलमानचा एक व्हायरल होत असलेला फोटो पाहून सलमान ‘किक २’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची चर्चा होत आहे.
Salman Khan New Film Announcement
Salman Khan New Film AnnouncementTwitter

Kick 2: २०२३ हे वर्ष सलमानच्या चाहत्यांसाठी फार महत्वाचे आहे. कारण त्याचे या वर्षात एक नाही तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच येत्या काही दिवसात सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सोबतच ‘टायगर ३’ हा चित्रपट देखील या वर्षात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानने यावर्षातील आगामी चित्रपट ‘किक’च्या सिक्वेलची घोषणा केली.

Salman Khan New Film Announcement
Aai Kuthe Kay Karte: लग्नाच्या पहिल्याच दिवशी अरुंधती नाश्त्याला काय बनवणार? आशुतोषची खास फर्माइश

सलमानचा ‘किक’ हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झाला होता. अनेक वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खान आणि राणी मुखर्जीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. या दोघांनीही तो फोटो Mrs Chatterjee Vs Norwayच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी भेटले होते. या व्हायरल होत असलेल्या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये प्रेक्षकांनी ‘किक २’बद्दल विचारले आहे.

व्हायरल होत असलेल्या सलमानच्या फोटोमध्ये सलमानचा लूक फ्रेंच दाढीमधील आहे. ‘किक’ या चित्रपटात सलमान ज्या लूकमध्ये दिसला होता त्याच लूकमध्ये पुन्हा तो दिसून आला आहे. अशा परिस्थितीत सलमान खानने ‘किक २’ चे शूटिंग सुरू केले आहे किंवा लवकरच सुरू होईल असा विश्वास चाहत्यांनी सोशल मीडियावरून लढवला आहे. तेव्हापासून, ‘किक २’ सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Salman Khan New Film Announcement
Neha Pendse: बाबो... नेहा पेंडसे एक नाही तर तब्बल सहा मुलांची आई; खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

‘किक’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला असून सलमानसोबत जॅकलीन फर्नांडिसने ही प्रमुख भूमिका साकारली होती. साजिद नाडियादवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 231.85 कोटींची कमाई केली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com