शिवलीला पाटलांच्या कीर्तनाला वारकऱ्यांचा विरोध; आयोजकांवर गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने, शिवलीला पाटील यांचे कीर्तन ठेऊन गर्दी जमा केल्याप्रकरणी दुर्गा उत्सव मंडळाच्या आयोजकांवर देऊळगावराजा पोलिसांनी गुन्हे दाखल
शिवलीला पाटलांच्या कीर्तनाला वारकऱ्यांचा विरोध; आयोजकांवर गुन्हा दाखल
शिवलीला पाटलांच्या कीर्तनाला वारकऱ्यांचा विरोध; आयोजकांवर गुन्हा दाखलSaam Tv

बुलढाणा : बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने, शिवलीला पाटील यांचे कीर्तन ठेऊन गर्दी जमा केल्याप्रकरणी दुर्गा उत्सव मंडळाच्या आयोजकांवर देऊळगावराजा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शिवलीला पाटील shivlila या बिग बॉस मराठी सिझन ३ च्या माजी स्पर्धक आहेत. त्या कीर्तनासाठी आले होते. यावेळी प्रचंड गर्दी झाली. दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे आयोजन चांगलंच महागात पडले आहे.

हे देखील पहा-

याप्रकरणी तिघांविरुद्ध बुलढाणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने याला विरोध दर्शवला आहे. पण, आयोजकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये, असे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी दिले होते. देऊळगाव मही या ठिकाणी राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने शिवलाली पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले.

शिवलीला पाटलांच्या कीर्तनाला वारकऱ्यांचा विरोध; आयोजकांवर गुन्हा दाखल
समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडूनच ठेवली जातेय पाळत?

यावेळी कीर्तनास २०० हून अधिक लोक याठिकाणी जमले होते. याबाबत पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पोलिसात तक्रार दिली. मंडळाचे आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे आणि किशोर पोफळकर (रा. देऊळगाव मही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.