Vijay Deverakonda: चित्रपटाच्या यशानंतर विजय देवरकोंडाचा मोठा निर्णय, 'कुशी'ची कमाई १०० कटुंबांना देणार

Vijay Deverakonda Big Decision on Kushi Movie Collection: ५ वर्षानंतर कुशी चित्रपटाच्या माध्यमातून विजयला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. त्याचा हा चित्रपट हिट ठरला आहे.
Vijay Deverakonda
Vijay DeverakondaSaam Tv

Kushi Movie Collection:

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याच्या नुकताच रिलीज झालेल्या 'खुशी' चित्रपटामुळे (Kushi Movie) चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) विजय आणि समंथा यांचा कुशी चित्रपट विक्रमी कमाई करत आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल दोन्ही कलाकार खूपच खूश आहेत.

चित्रपटाच्या यशानंतर विजयने नुकताच देवाचे दर्शन घेतले. ५ वर्षानंतर कुशी चित्रपटाच्या माध्यमातून विजयला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. त्याचा हा चित्रपट हिट ठरला आहे. अशामध्ये चित्रपटाच्या यशानंतर विजय देवरकोंडाने मोठा निर्णय घेतला आहे. कुशीची कमाई तो १०० कुटुंबांना मदत म्हणून देणार आहे.

Vijay Deverakonda
Shah Rukh Khan At Tirupati: 'जवान'च्या यशासाठी 'किंग खान' पोहचला तिरुपतीला, मुलगी सुहानासोबत घेतलं व्यंकटेश स्वामींचं दर्शन; VIDEO आला समोर

'कुशी'च्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी ४ सप्टेंबरला विशाखापट्टणममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये विजय देवरकोंडाने हजेरी लावली. यावेळी त्याने चित्रपटाला भरभरुन प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. याचवेळी विजयने मोठी घोषणा केली. त्याने चित्रपटाच्या कमाईतून एक कोटी रुपये गरजू कुटुंबांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. विजय देवरकोंडाच्या या निर्णयाचे खूपच स्वागत होत आहे.

Vijay Deverakonda
Kiran Mane On Maratha Reservation Protest: ‘सावध रहा,शत्रु कुटिल कारस्थानी आहे...’; मराठा आरक्षणावरून किरण मानेंचा सरकारवर हल्लाबोल

विजय देवरकोंडाने सांगितले की, 'मला माझ्या चाहत्यांसोबत कुशीच्या यशाचे सेलिब्रेशन करायचे आहे. त्यामुळे मी १०० कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश देणार आहे. या कुटुंबांची यादी आज जाहीर करण्यात येणार आहे.' तसंच त्याने सांगितले की, 'चाहते आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्हाला हा आकडा आणि यश मिळत आहे. या यशाचे कारण तुम्हीच आहात. मी जिंकावे आणि माझे चित्रपट यशस्वी व्हावेत अशी तुमच्या सर्वांची इच्छा आहे. माझे चित्रपट फ्लॉप झाले तर ते दुःखी होतात. माझे चित्रपट हिट झाले तर ते आनंदी होतात.'

Vijay Deverakonda
Jaane Jaan Trailer: करीना कपूर कोणाच्या जाळ्यात अडकणार? सस्पेंस थ्रिलर 'जाने जान'चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

विजयने पुढे चाहत्यांना असे आश्वासन दिले आहे की, 'हे मी या व्यासपीठावरून सांगत आहे. यापुढे मी माझ्या कुटुंबासह तुमच्यासाठी १०० टक्के काम रेन. आपण नेहमी हसले पाहिजे. मला तुम्हा सर्वांसोबत आनंद शेअर करायचा आहे. मला तुझे हसू पहायचे आहे. त्यासाठी काहीतरी करावे लागेल. मी तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही. मी माझ्या 'कुशी'च्या कमाईतून एक कोटी रुपये माझ्या कुटुंबाला देत आहे. जेणेकरून मी माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करू शकेल. मी लवकरच १०० कुटुंबांची निवड करेन आणि प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांचा धनादेश देईन. मी माझी कमाई आणि माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करेन.'

Vijay Deverakonda
Sukhee Movie Trailer: 'उद्या तुम्हीसुद्धा म्हणणार मी सुखी आहे', शिल्पा शेट्टीच्या 'Sukhee'चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

तसंच, 'मी माझ्या सोशल मीडिया पेजवर उद्या एक फॉर्म शेअर करेन. मी अद्याप योजना आणलेली नाही. मी फॉर्मला 'स्प्रेडिंग हॅपीनेस' किंवा 'देवरा फॅमिली' असे नाव देईन आणि तो पाठवणार आहे. या पैशांतू तुम्ही भाडे, फी भरू शकता किंवा काहीही करु शकता. मला आनंद होईल. येत्या 10 दिवसांत आम्ही हैदराबादमध्ये 'कुशी'चे यश साजरे करू. त्यापूर्वी मी हे काम पूर्ण करण्याचा आणि १०० कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. एकदा मी हे काम पूर्ण केले तर मी यशाचा खरा आनंद घेऊ शकेल.'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com