कॅाफी विथ करण- ७ च्या नव्या पर्वात दिसणार आमिर खान आणि करिना कपूर, प्रोमो रिलीज

बॅालिवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण- ७' बहुचर्चित शो आहे.
Koffee with Karan
Koffee with KaranSaam Tv

मुबंई: बॅालिवूडचा (Bollywood) प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण- ७' बहुचर्चित शो आहे. आतापर्यत ७ व्या सीझनचे चार भाग झाले आहेत. कॅाफी विथ करणच्या प्रत्येक सीझनमध्ये बॅालिवूडच्या दिग्गज कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. विशेष म्हणजे अनेक बॅालिवूड स्टार्ससह साऊथ सुपरस्टार या शोचा भाग बनले आहेत. अलीकडेच या मोसमातील चौथ्या भागात अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा सहभागी झाले होते.

या शो'मध्ये कलाकार त्यांचे चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यावर मनसोक्त गप्पा मारतात. यामुळेच हा 'शो' चर्चेत आला आहे. कॅाफी विथ करण ७ आगामी एपिसोड देखील खूप मजेशीर असणार आहे. आता या सीझनच्या नव्या भागामध्ये मिस्टर परफेक्शननिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूर (Karina Kapoor) हजेरी लावणार आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ रिलीज झाला आहे. त्यामुळेच दोघांचे चाहते कॅाफी विथ करण -७ आगामी भागाच्या प्रतिक्षेत आहे.

Koffee with Karan
Kaun Banega Crorepati: आमिर खानची केबीसी शोच्या प्रमोशनमधून माघार, अमिताभ बच्चनने उडविली खिल्ली

शोच्या नवीन प्रोमोमध्ये होस्ट करण जोहर आमिर खान आणि करिना कपूर यांचे मजेदार स्विक्वल पाहायला मिळतो आहे. अमिर खान आणि करिना कपूर दिलखुलास गप्पा मारत आहे. दरम्यान, आमिर खान शो चे होस्ट करण जोहरला विचारतो, "जेव्हापण तुम्ही हा शो घेता, तुमच्या या शो मध्ये कोणी ना कोणा रडतोच." त्याचवेळी, करण करिनाला तिच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारतो, ज्याचे उत्तर करिना करणला उलटा प्रश्न करत देते की, "याविषयी तुला माहीत नाही का?" करिनाचे हे उत्तर ऐकून करण म्हणतो, 'माझी आई देखील हा शो बघते' करणचं हे उत्तर ऐकताच, आमिर देखील या संवादामध्ये सहभागी होतो आणि करणच्या उत्तरावर आमिर खान म्हणतो, जेव्हा तू इतरांच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारतो, तेव्हा तुझी आई शो पाहत नाही का?

Koffee with Karan
Dia Mirza: दिया मिर्झाच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

कॅाफी विथ करण -७ पाचव्या भागाचा प्रोमो डिस्ने प्लस हॉटस्टार रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये करीना कपूर खान तिच्या फॅशन सेन्सबद्दलही बोलते. दरम्यान, करीना कपूर खान कलाकारांच्या शूटिंगशी संबधित म्हणतो, आमिर खान एखादा चित्रपटाच्या शूटिंगसाठी २०० दिवस घालवतात, तर अक्षय कुमार हा चित्रपट 30 दिवसांत कसा बनवतो असा प्रश्न तिने केला.

कॉफी विथ करण सीझन ७ चा आगामी भाग खूप धमाकेदार असणार आहे. शोमध्ये आमिर आणि करीनाने केवळ त्याच्या आयुष्यातील खुलासे केले नाहीतर, अनेक सेलिब्रिटीचे खळबळजनक खुलासे केले आहेत. ४ आॅगस्टला हा खास भाग ओटीटीवर प्रसारित होणार आहे. (Koffee with Karan)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com