5 Years Of Raabta : सुशांतसिंहच्या आठवणींनी कृती सेनन भावुक, गायलं हे खास गाणं

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या 'राबता' या चित्रपटाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. . कृती सेनन सुशांत सिंह राजपूतसोबतच्या आठवणींनी भावुक झाली. तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून त्या आठवणींना उजाळा दिला.
5 Years Of Raabta : सुशांतसिंहच्या आठवणींनी कृती सेनन भावुक, गायलं हे खास गाणं
kriti sanon instagrmSaam Tv

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (suhant singh rajput) आणि कृती सेननच्या 'राबता' या चित्रपटाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिनेश विजनने हा चित्रपट (movie) दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट ९ जून २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाशी अभिनेत्री कृती सेननच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. १४ जून २०२० रोजी सुशांतचा मृत्यू झाला होता. कृती सेनन त्याच्यासोबतच्या आठवणींनी भावुक झाली आहे. तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून त्या आठवणींना उजाळा दिला.

kriti sanon instagrm
सैराटची 'आर्ची' येतेय नवीन अवतारात, चित्रपटाचा ट्रेलर पाहा!

कृती सेननने इंस्टाग्रामवर एक गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दिग्दर्शक अमर कौशिक यांनी शूट केलेल्या 'भेडिया' चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे दिसते आहे. या व्हिडिओमध्ये कृती सेनन 'राबता' हे गाणं गाताना दिसत आहे.

kriti sanon instagrm
ऐश्वर्याने व्यक्त केली इच्छा; पुन्हा अभिषेकसोबत...

कृती म्हणाली, आठवणींनी भरलेला चित्रपट

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिग्दर्शक दिनेश विजन यांच्यासाठी कृती सेननने इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करून 'राबता'च्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. पोस्टखाली कृतीने 'मेहरबानी जाते जाते मुझपे कर गया, गुजरता सा लम्हा एक दामन में भर गया' या 'राबता' चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. त्यात ती म्हणाली की, हे अनेक अर्थाने माझ्यासाठी खास आहे. आठवणींनी भारलेला राबता हा चित्रपट होता. माझ्या हृदयाच्या जवळचा प्रवास आणि तुम्हा दोघांसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. सुशांत आणि दिनू. राबताची ५ वर्षे. ' माझ्या गाण्याकडे लक्ष देऊ नका, त्यामागील भावना शुद्ध आहे,' असंही तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुशांत सिंग राजपूतचे चाहतेही कृती सेननने पोस्ट केलेल्या या व्हिडिओचे कौतुक करत आहेत. सुशांतच्या अनेक चाहत्यांनी कृती सेननच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. 'खूप सुंदर भेट तू सुशांतला दिली आहेस', अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं दिली. 'राबता हा खूप सुंदर चित्रपट आहे. त्यात तू आणि सुशांतने खूपच मस्त काम केलं आहे', असं एका चाहत्यानं म्हटलं आहे.

कृती सेननच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर 'गणपत', 'शेहजादा', 'भेडिया' आणि 'आदीपुरुष' हे तिचे आगामी चित्रपट आहेत. तसेच कृती सेनन अनुराग कश्यपसोबतच्या एका चित्रपटातही काम करणार आहे, अशी माहिती मिळते.

Edited By - Shruti Kadam

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com