Kriti Sanon On Adipurush Film Character: ‘रामायणातील सीतेचे पात्र साकारणे माझ्यासाठी...’ म्हणत क्रितीने केला महत्वाचा खुलासा

Kriti Sanon Devotional Character: नुकतेच क्रितीने मुलाखतीत चित्रपटातील भूमिकेविषयी सांगितले आहे.
Kriti Senon Devotional Character
Kriti Senon Devotional CharacterSaam Tv

Kriti Sanon Played Sita Role: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. येत्या १६ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रभास, क्रिती सेनन, देवदत्त नागे, सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रभासने रामाची भूमिका साकारली आहे, तर क्रितीने रामायणातल्या सीतेची म्हणजेच ‘जानकी’चे पात्र साकारले.

Kriti Senon Devotional Character
Akshay Kumar Played Voleyball: ‘काम राहिलं बाजूला आणि खेळतोय...’ पोलिसांसोबत व्हॉलिबॉल खेळताना अक्षयचा व्हिडीओ व्हायरल

नुकताच क्रितीने चित्रपटातील पात्राविषयी मुलाखत दिली आहे. ती मुलाखतीत म्हणते, “रामायणातील सीतेचे पात्र साकारणे माझ्यासाठी फार आव्हानात्मक होते. चित्रपटात इतके मोठे पात्र साकारणे म्हणजे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती, पण मी ते पात्र अगदी लिलया साकारले. माझ्या खांद्यावर या भूमिकेला व्यवस्थित न्याय देण्याची जबाबदारी होती. एका अभिनेत्याला त्याच्या कारकिर्दीत सहसा अशा चांगल्या, प्रभावशाली भूमिका मिळत नाहीत.”

चित्रपटाची घोषणा होताच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. चित्रपटातील व्हिएफएक्स आणि सैफ अली खानच्या लूकवरून त्याला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केले. निर्मात्यांनी चित्रपटातील बदल केल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासात ट्रेलरला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. सोबतच चित्रपटातील पहिले गाणे ‘जय श्री राम’ प्रदर्शित झाले होते. या गाण्याने एका दिवसात यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवण्याचा विक्रमही केला. तसेच चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे दुसरे गाणे २९ मे रोजी प्रदर्शित होणार असून या गाण्याचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Kriti Senon Devotional Character
Babil Khan at IIFA 2023 Awards: बाबिल खान ठरला 'बेस्ट डेब्यूटन्ट ऑफ इयर', या खास क्षणी घातला होता वडिलांचा सूट

रामायणावर आधारित असलेला हा चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होत आहे. प्रभास रामाच्या भूमिकेत, क्रिती जानकी अर्थात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर लक्षणाच्या भूमिकेत सनी सिंग आणि सर्वाधिक ट्रोल झालेला सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. ओम राऊत यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून कृष्ण कुमार, राजेश नायर, भूषण कुमार, प्रसाद सुतार आणि ओम राऊत यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com