Aamir Khan-Fatima Sana Shaikh Wedding Rumors: आमिर खान करतोय तिसरे लग्न? बॉलिवूड अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ

Aamir Khan-Fatima Sana Shaikh Relationship: आमिर आणि फातिमाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Aamir Khan-Fatima Sana Shaikh Video
Aamir Khan-Fatima Sana Shaikh VideoSaam TV

KRK Tweet On Aamir Khan-Fatima Sana Shaikh: आमिर खान सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे. आमिरची होत असलेली चर्चा त्याच्या आगामी चित्रपटाची नसून त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. नुकताच मिस्टर परफेक्शनिस्ट दंगलमध्ये त्याच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत दिसला. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा सोशल मीडियावर वेग धरू लागल्या आहेत.

या सर्व प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता केआरकेने नवा दावा केला आहे की, आमिर खान त्याची सहकलाकार अभिनेत्री फातिमा सना हिच्याशी लग्न करणार असून, हे त्याचे तिसरे लग्न असेल.

वायआरएफच्या ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये एकत्र काम केल्यानंतर चाहत्यांच्या नजरा आमिर खान आणि फातिमा सना यांच्या जोडीकडे लागल्या होत्या. त्याचवेळी दोघांच्या डेटींगच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, दोन्ही स्टार्सचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ते पिकलबॉल गेम खेळताना दिसत आहेत.

आमिर आणि फातिमाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर त्यात आता केआरकेने ट्विट करून दावा केला आहे. त्याने लिहिले की, 'ब्रेकिंग न्यूजः आमिर खान लवकरच त्याच्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखसोबत लग्न करणार आहे. #दंगल चित्रपटापासून आमिर खान सनाला डेट करत आहे.' हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि अभिनेत्याला ट्रोल केले.

केआरकेने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने लिहिले आहे की, “मला कळत नाही की जर आमिर खान या वयात लग्न करू शकतो तर मी पुन्हा लग्न का करू शकत नाही.” या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी केआरकेला दुरुस्त करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले तिसरे लग्न होईल, असे सांगून आमिर खान आणि फातिमाच्या नेटकरी दोघांना ट्रोल करत आहेत. परंतु आता हे ट्विट डिलिट करण्यात आहे.

फातिमा सनाने आमिर खानच्या दंगल या चित्रपटात त्याच्या मुलीची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाची चाहत्यांनी प्रशंसा केली होती. याशिवाय दोघांनी ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्येही एकत्र काम केले आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर आमिर खानने दोन लग्न केले आहे. त्यांची पहिली पत्नी रीना दत्ता, जिच्यासोबत त्यांना मुलगी इरा आणि मुलगा जुनैद आहे. तर दुसरे लग्न किरण राव यांच्यासोबत झाले होते, त्यांना सरोगसीद्वारे मुलगा आझाद राव खान आहे. तर 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com