TV Actress: टीव्ही अभिनेत्री मानसिकदृष्ट्या खचली; सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Kumkum Bhagya Fame Actress: इन्स्टाग्रामवर एका पाठोपाठ एक व्हिडिओ आणि नोट्सच्या मदतीने शिखाने शिखाने तिची वेदना व्यक्त केली आहे.
Shikha Singh Social Media Post
Shikha Singh Social Media PostInstagram @shikhasingh

Shikha Singh Social Media Post: प्रसिद्ध टीव्ही मालिका 'कुंडली भाग्य'मधील अभिनेत्री शिखा सिंह सध्या मालिकेपासून लांब आहे. शिखा तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. शिखा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. शिखाने स्वतः याबद्दल सांगितले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत शिखाने ही माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर एका पाठोपाठ एक व्हिडिओ आणि नोट्सच्या मदतीने शिखाने शिखाने तिची वेदना व्यक्त केली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून शिखाने ती मानसिक तणावातून जात असल्याचे सांगितले आहे. तसेच ती स्वतःला खूप मिस करत आहे, असेही शिखा म्हणाली आहे.

शिखाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, खूप दिवस झाले मी स्वतःला भेटले नाही. आता मी स्वतःला खूप मिस करत आहे. या पोस्टशिवाय, तिची मुलगी अलयनासोबतचा एक फोटो शेअर करताना शिखाने लिहिले की, 'मी अजूनही आनंदी का नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुझे (अलायना) प्रेम मला मिळाले हे मी भाग्यवान समजतो.'

Shikha Singh Social Media Post
Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रा फेम शिवाली परब म्हणतेय 'म्याड केलंस तू'; चाहते म्हणतात, आता हे काय नवीन?

पुढे शिखाने तिच्या मुलीसाठी तिच्या भावना व्यक्त केले आहे, अशावेळी माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. मला सांगायचे आहे की दररोज बरेच लोक वैद्यकीय आणि मानसिक समस्यांचा सामना करतात. परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल.

लवकरच तुमची चांगली वेळही येईल. स्वतःला मजबूत ठेवा आणि सकारात्मक विचार करा. तसेच तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करा. पहाटे आलियानाकडून प्रेमाचा डोस मिळाल्यानंतर मला थोडे बरे वाटले.

शिखाने लिहिले की, “आलियानाचे स्पर्श, मला केलेले किस आणि तिचे प्रेमळ शब्द माझे मन आनंदित करतात. मला आशा आहे की मला लवकरच पूर्वीसारखे आनंदी वाटेल. शिखाच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिखाच्या पोस्टवर कमेंट करताना अंकिता भार्गवने लिहिले की, ही वेळही निघून जाईल. परी (मुले) आपल्याला जीवनातील सर्वात आनंद आणि समाधान देतात.

शिखाच्या पोस्टवर कमेंट करताना शिखाची मैत्रिण जसवीर कौर म्हणाली की, हा देखील जीवनाचा एक भाग आहे. ही वेळही निघून जाईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. शिखाने 2016 मध्ये करण शाहसोबत लग्न केले होते. तर 2020 मध्ये शिखा आई झाली. त्यानंतर शिखाने तिच्या करिअरला ब्रेक दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com