
कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची कॉमेडी म्हणजे प्रेक्षकांचे हमखास मनोरंजन. या दोघांच्या आजूबाजूला असणारे सगळे नेहमी हसतच असतील. दोघांची केमिस्ट्री भन्नाट आहे. भाऊ आणि कुशल एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. वेळोवेळी त्यांच्या मैत्रिच्या गंमती दोघेही सांगत असतात.
कुशल बद्रिकेने आणि भाऊचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही त्यांच्या कॉमेडीने नेटकऱ्यांची मने जिंकत आहेत.
कुशल बद्रिके आणि भाऊ कदमच्या या व्हिडीओमध्ये कुशल गायनाचा सराव करत आहेत. त्याच्या सरावादरम्यान भाऊ येतो. भाऊ येताच कुशल त्याचे 'या भाऊतूल्ला खाँसाहेब' असे म्हणत स्वागत करतो. तर भाऊ कुशलला म्हणतो 'बाहेर लोकांची गर्दी आहे.' त्यावर कुशल त्याला म्हणतो, 'फॅन म्हटल्यावर गर्दी तर होणारच'
कुशल या व्हिडीओमध्ये 'राग रतन' या गाण्याचं रियाज करत असतो. कुशल रियाज करत असलेले गाणे गाऊ लागतो. 'ए शहाण्या कानपटात मरेन आता, देईन न एक. चाल ए तिकडे फूट' हे गाणं गायल्यावर कुशल भाऊला म्हणतो कसं वाटलं 'राग रतन'.
यावर भाऊ म्हणतो, 'वाह वाह, उगाच नाही लोक तुम्हाला मारखाँसाब म्हणतात. बाहेर जाऊ नका हा. बाहेर जी लोकांची गर्दी जमली आहे ती तुम्ही घेतलेल्या पैशांसाठी राग रतन द्यायला.' हा फनी व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर कमेंट करून भाऊ आणि कुशलच्या कॉमेडीचे कौतुक करत आहेत. (Latest Entertainment News)
या व्हिडीओला कुशलने कॅप्शन देत लिहिले आहे, 'एखाद्या रागावर हुकुमत मिळवायची म्हणजे काही साधी गोष्ट नाही, तोब्रा बरेशी खाँ “ साहेबांच्या रियाजाला साक्षात “भाऊतूल्ला खाँ” साहेब हजर. राग -“ रतन “'
कुशलच्या या पोस्ट एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे की, 'काही म्हणा पण कॉमेडी कशी आणि कुठून जनरेट करायची हे फक्त कुशल सर भाऊ सर यांनाच जमत.' दार दुसऱ्या नेटकाऱ्याने कमेंट केली आहे, 'आम्ही येतोय आज रात्री राग रतन दयायला. लवकरच भेटू.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.