ललित मोदी आणि सुष्मिता सेन लवकरच अडकणार लग्नबंधनात ? चर्चांना उधाण

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी विवाह केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
lalit modi and sushmita sen dating
lalit modi and sushmita sen datingsaam tv

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (sushmita sen) आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांनी विवाह केल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. ललिल मोदी यांनी इन्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमुळे सुष्मिता सेनसोबत विवाह केल्याची चर्चा सुरू झाली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये काही फोटो हे मालदिव येथील आहेत. तर फोटोसहित 'एक नवीन सुरूवात', असं कॅप्शनही दिलं आहे. त्यामुळे दोघांनी विवाह केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (lalit modi and sushmita sen dating)

ललित मोदी हे भारतात आयपीएल (IPL) स्पर्धेची स्थापन करणारे आहेत. त्यामुळे ते नेहमी प्रकाशझोतात असायचे. त्यानंतर काही गैरव्यवहारामुळे ललित मोदी यांना काही वर्षांपूर्वी फरार म्हणून घोषित करण्यात आले. या गैरव्यवहारामागे मोदी यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर ते फरार झाले. तर अभिनेत्री सुष्मिता सेन ही माजी विश्वसुंदरी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच अनेक सिनेमातही काम केले आहे. सुष्मिताने एक मुलगी देखील दत्तक घेतली आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

दरम्यान, ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांचे लग्न झाले असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. मात्र, फोटो व्हायरल होताच ललित मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ललित मोदी म्हणाले,'फक्त स्पष्टीकरण देत आहे. आम्ही विवाह केलेला नाही. आम्ही फक्त एकमेकांना डेट करत आहोत. लग्नही एक दिवस होणारच आहे'. त्यामुळे ललित मोदी आणि सुष्मिता सेन हे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्यात त्यांनी फोटो शेअर करताच त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com