Anand Dighe: धर्मवीरांच्या आयुष्यावर आधरित प्रविण तरडेंचा सिनेमा (पहा Teaser)

Dharmaveer Anand Dighe: त्याकाळी ठाण्यात शिवसेनेला मोठं करणारं एकमेव नावं म्हणजे आनंद दिघे. त्यांच्या कार्यामुळे आणि व्यक्तीमत्वामुळे त्यांना गुरुवर्य, धर्मवीर म्हणून संबोधलं जाऊ लागलं.
Dharmaveer Anand Dighe biography By Pravin Tarde
Dharmaveer Anand Dighe biography By Pravin TardeInstagram/@/pravinvitthaltarde

मुंबई: ठाण्याचा ढाण्या वाघ आणि प्रति बाळासाहेब म्हणून ओळख असणारे शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर लवकरत एक मराठी चित्रपट (Upcoming Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते तथा दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तर मंगेश देसाई (Mangesh Desai) या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रविण तरडेंनी स्वतः या चित्रपटाची घोषणा करत या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. (Late ShivSena Leader Dharmaveer Anand Dighe biography By Pravin Tarde)

हे देखील पहा -

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित चित्रपटांनंतर आता प्रविण तरडे आपल्या आगामी चित्रपटासाठी तयार आहेत. २७ जानेवारी रोजी आनंद दिघेंच्या (Anand Dighe) जयंतीदिनी तरडेंनी या चित्रपटाची घोषणा केली. ठाण्यात आनंद दिघेंच्या जयंतीदिनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला होता. आनंद दिघे हे वापरत असलेली गाडी दुरुस्त करुन शिवसैनिकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. याप्रसंगी त्यांनी या चित्रपटाची माहिती दिली. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरु झालं असून अद्याप इतर माहिती मिळालेली नाही.

कोण होते आनंद दिघे?

आनंद दिघेंचा जन्म 27 जानेवारी 1952 साली झाला. ठाण्यातल्या टेंभी नाका (Tembhi Naka, Thane) परिसरात त्यांचं घर होतं. या परिसरात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सभा व्हायच्या. बाळासाहेबांच्या भाषणांनी आणि ठाकरी शैलीने ते बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते झाले त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी (Shivsena) काम करायचं ठरवलं आणि 70 च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. आनंद दिघेंच्या कामाचा सपाटा पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली होती.

आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरात 'आनंद आश्रमा'ची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात 'जनता दरबार' भरायचा. परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे. त्याकाळी ठाण्यात शिवसेनेला मोठं करणारं एकमेव नावं म्हणजे आनंद दिघे. त्यांच्या कार्यामुळे आणि व्यक्तीमत्वामुळे त्यांना गुरुवर्य, धर्मवीर म्हणून संबोधलं जाऊ लागलं. (#वंदनीय #गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे #साहेब)

Dharmaveer Anand Dighe biography By Pravin Tarde
Pegasus Spyware Deal: 'साबित हो गया! चौकीदार ही जासूस है'; मोठ्या खुलास्यामुळे काँग्रेस आक्रमक

२४ ऑगस्ट २००१ रोजी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि २६ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने ठाण्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या (2001) शोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, "आनंदच्या दाढीत हुकूमत होती. त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिम्मत नव्हती.''

(माहिती साभार: BBC)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com