Gautami Patil First Movie: गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; घुंगरू चित्रपटातून अभिनयात पदार्पण

Gautami Patil New Movie: अनेक दिवसांपासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे
Gautami Patil
Gautami PatilSaam TV

Gautami Patil Movie Ghungroo Teaser Out : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते.

अशात अनेक दिवसांपासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमीला मराठी सिनेसृष्टितील एका चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली आहे.

Gautami Patil
WATCH IPL 2023: Sanju Samson ने टिपला IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल! पाहा व्हिडिओ - VIDEO

घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झळकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांनी पहिल्या आहेत. अशात आता गौतमिचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे समजले आहे.

घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीचं अभिनेत्री होण्याचं स्वप्न साकार झालं आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झाले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)

टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजते की कलावंतांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिचं मनोगत व्यक्त केलं आहे. घुंगरू हा चित्रपट कलाकारांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांना आवडेल, असं गौतमीने म्हटलं आहे.

Gautami Patil
IPL 2023 Orange Cap List: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय फलंदाजांचा दबदबा; ऋतुराज अव्वल स्थानी तर हे आहेत टॉप 5 फलंदाज

गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्वच अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झाली आहे. गौतमी तिच्या डान्ससह अश्लील हातवारे केल्याने ट्रोल झाली होती.

गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लीक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवलं आहे. टीझर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com