Salman Khan: सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट, बिश्नोई टोळीचा प्लान बी उघड

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचे संकट काही संपण्याचे नाव घेत नाही आहे.
Salman Khan Image
Salman Khan ImageSaam Tv

मुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खानचे (Salman Khan) संकट काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. तो बऱ्याच दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर आहे. सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई टोळीने प्लान बी बनवला होता

सूत्रांनी सांगितले की, लॉरेश बिश्नोई टोळीने सलमान खानला मारण्यासाठी प्लॅन बी तयार केला होता. या योजनेअंतर्गत सलमान खानला त्याच्या पनवेल फार्महाऊसजवळ ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, त्यासाठी रेकीही करण्यात आली होती.

पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकतीच भारत-नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आलेल्या लॉरेश विश्नोई टोळीचा महत्वाचा मेंबर गोल्डी ब्रार, कपिल पंडित याने या योजनेचे नेतृत्व केले होते.

हे देखील पाहा -

कपिल पंडित, संतोष जाधव आणि दीपक मुंडी यांच्यासह अन्य काही शूटर मुंबईजवळील पनवेलमध्ये भाड्याच्या खोलीत सुमारे दीड महिना मुक्कामाला होते. त्यावेळी आरोपींनी सलमानच्या फार्महाऊस व त्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांची रेकी केली होती. तसेच हल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांचीही जुळवा जुळव केली होती.

दीपक मुंडी यांनीही मोठा खुलासा केला

दुसरीकडे, सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पोलिसांनी पकडलेला शूटर दीपक मुंडी याने मुसेवाला खून प्रकरणासंदर्भात पंजाब पोलिसांच्या रिमांडदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. सिद्धू मूसवाला हत्याकांडात राजस्थानचेही मोठे कनेक्शन समोर आले आहे. दीपक मुंडीच्या चौकशीदरम्यान अनेक गुंडांची नावे समोर आली आहेत. शस्त्रास्त्रांपासून ते इतर मोठे कनेक्शनही समोर आले आहेत. पंजाब पोलिसांच्या तीन तुकड्याही राजस्थानला रवाना झाल्या आहेत.

Salman Khan Image
संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं अमोल कोल्हेंनी केलेलं नामांतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बदललं

मुसेवाला यांची २९ मे रोजी हत्या झाली होती

दिल्ली पोलिसांनी यापूर्वी तीन नेमबाजांना अटक केली होती, तर पंजाब पोलिसांनी चकमकीत आणखी दोघांना ठार केले होते. 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला या प्रसिद्ध पंजाबी गायकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुंडीचे दोन साथीदार कपिल पंडित आणि राजिंदर जोकर यांच्यावर हत्येसाठी शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. मुंडी, पंडित आणि जोकर यांना जिल्हा न्यायालयाने रविवारी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com