Happy Birthday Aamir Khan: चित्रपटाचे पोस्टर लावणारा आमिर आज बॉलिवूडमध्ये आहे सर्वोत्कृष्ट, संपत्ती पाहाल तर येईल आकडी

वर्षातून एक चित्रपट करणाऱ्या आमिरकडे आहे कोट्यवधींची संपत्ती.
Aamir khan net worth
Aamir khan net worthInstagram

Aamir Khan Net Worth: मिस्टर परफेक्टशनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता अमीर खानचा आज वाढदिवस आहे आहे. आमिर खान आज ५८ वर्षाचा झाला आहे. अमीर वर्षून एकच चित्रपट करतो पण तो हिट होतोच. म्हणूनच कदाचित त्याला परफेक्टशनिस्ट म्हटले जाते.

आमिर जरी वर्षातून एक चित्रपट करत असला तरी त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. आमिर बॉलिवूडमधील श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. चला तर मी आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याची संपत्ती.

Aamir khan net worth
Oscars 2023: ऑस्करमध्ये सर्वात जास्त पुरस्कार मिळालेला चित्रपट 'Everything Everywhere All at Once' कुठे पाहता येईल? जाणून घ्या

आमिरला सुरूवातीच्या काळात बराच संघर्ष करावा लागला होता. बाल कलाकार म्हणून काम केल्यानंतरही बॉलिवूडमध्ये पाय रोवणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. एक वेळ अशी होती जेव्हा स्वतःच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आमिर रिक्षातून प्रवास करत रस्त्यावर पोस्टर चिकटवायचा. प्रचंड संघर्षानंतर आमिर यशाच्या शिखरावर पोचला आहे.

आमिरच्या संपत्तीविषयी बोलायचे झाले तर त्याचे मुंबईतील पॉश भागात एक आलिशान घर आहे. 2009 मध्ये त्याने हे घर विकत घेतले. त्यावेळी या घराची किंमत सुमारे 18 कोटी रुपये होती. आमिरने आपले घर अगदी साधे आहे.

पांढऱ्या रंगाच्या भिंती, लाकडी फर्निचर, खाटा, पुस्तकांचे कपाट इत्यादींनी सजलेले हे घर अगदी सामान्य कुटुंबाच्या घरासारखे आहे. पाचगणीमध्ये आमिरचा एक सुंदर बंगलाही आहे, दोन एकरात पसरलेला हा बंगला आमिरने सात कोटी रुपयांना विकत घेतला होता.

आमिरलाही इतर स्टार्सप्रमाणे लक्झरी आणि महागड्या गाड्यांचा शौक आहे. आमिरकडे एकूण नऊ आलिशान कार आहेत, ज्यांची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. आमिरच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ, रोल्स रॉयस आणि फोर्ड कारचा समावेश आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त आमिर खान जाहिरातींमधूनही भरपूर पैसे कमावतो. आमिर एका वर्षात 120 कोटी रुपये कमावतो. या वर्षात त्याच्या उत्पन्नाचा आलेख आणखी उंचावला आहे. रिपोर्ट्सनुसार, आमिरची एकूण संपत्ती सुमारे $210 दशलक्ष आहे. आमिरकडे भारतीय चलनानुसार 1562 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com