महाराष्ट्राचे लाडके म्हणतं, lil champs ना मिळाली प्रेक्षकांची नापंसती

सोशल मिडियावर या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणजेचं रोहित राऊत , अर्या आंबेकर , कार्तिक गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांना चांगलेच ट्रोल केलं जात आहे .
महाराष्ट्राचे लाडके म्हणतं, lil champs ना मिळाली प्रेक्षकांची नापंसती
महाराष्ट्राचे लाडके म्हणतं, lil champs ना मिळाली प्रेक्षकांची नापंसती Saam Tv

मुंबई : सारेगमपचं नवीन पर्व सुरू झालं आहे. या पर्वात महाराष्ट्राचे लाडके lil champs निवडणार आहेत उद्याचे lil champs पण सा स्पर्धेला सुरूवात होताच एक वेगळं चित्र सोशल मिडियावर सध्या सुरू झालं आहे. सोशल मिडियावर Social Media या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणजेचं रोहित राऊत , अर्या आंबेकर , कार्तिक गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांना चांगलेच ट्रोल केलं जात आहे . lil champs got audience dislike

महाराष्ट्राचे लाडके पंचरत्नाना त्याच्या शोमधील त्यांच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे Over Acting सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. बॉलिवूड मधील प्रसिद्ध हिंदी गायिका नेहा कक्करसोबत Neha Kakkad कार्तिकी गायकवाडची तुलना केली जात आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा आणि कार्तिकीचे मीम्स व्हायरल होत आहेत. या शोमधील मेंटॉर प्रथमेश लघाटेला 'महेश काळे यांची कॉपी करत आहे' असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल Troll केलं आहे.

तसेच आर्या आंबेकर आणि रोहित राऊतच्या जजींग बद्दल अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या कोणत्याही मिमसला हे पंचरत्नानी कोणतही उत्तर दिलं नाही आहे .

महाराष्ट्राचे लाडके म्हणतं, lil champs ना मिळाली प्रेक्षकांची नापंसती
बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया

पण शेवटी या सगळ्या गोष्टी पाहता या शोची सूत्रसंचालीका मृण्मयी देशपांडे हिंनं मात्र संदेतोड उत्तर दिलं आहे. 'तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं ? हाताची घडी घालून शांत बसला असतात का ?' असं उत्तर मृण्मयीनं दिलं आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com