Munawar Faruqui Break Up: मुनव्वर फारुकीचे ब्रेकअप; सोशल मीडियावर केले अनफॉलो

'लॉक अप' या रिऍलिटी शोमधून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी प्रचंड चर्चेत आला होता.
Munawar Faruqui Break Up
Munawar Faruqui Break UpSaam Tv

मुंबई - 'लॉक अप' या रिऍलिटी शोमधून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) प्रचंड चर्चेत आला होता. व्यावसायिक आयुष्यासोबतच मुनव्वर आपल्या खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुनव्वर चर्चेत आला आहे.

मुनव्वरने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आपण नाझीला नताशाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. दोघेही मुंबईत (Mumbai) अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. या दोघांचा एक म्युझिक व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. म्युझिक व्हिडिओमध्ये दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त पाहायला मिळाली. मात्र आता या दोघांचे ब्रेकअप झाले आहे.

हे देखील पाहा -

मुनावर फारुकी आणि नाझीला नताशा यांचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले आहे. असे असले तरी या दोघांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मुनव्वर याने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

Munawar Faruqui Break Up
'लम्पी' विषयी संपर्कासाठी मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना; जाणून घ्या दूरध्वनी क्रमांक

कंगना राणौतचा रिअॅलिटी शो 'लॉक अप' जिंकल्यानंतर मुनव्वरच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. या शोदरम्यान त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले, हे जाणून त्याचे चाहतेही हैराण झाले. त्याने सांगितले होते की तो आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा आहे. याशिवाय सध्या दोघेही वेगळे राहतात आणि त्यांची केस कोर्टात सुरू असल्याचेही त्याने सांगितले होते. शो जिंकल्यानंतर त्याने नाझीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com