
Madhuri Dixit Social Media Post: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे काल निधन झाले. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आईचे निधन झाल्यानंतर माधुरीने आपल्या आईच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या माधुरीची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल आहे.
फोटो शेअर करत माधुरीने कॅप्शन लिहिले की, “आज सकाळी उठून आईची खोली रिकामी दिसली. ते अतिवास्तव वाटते. तिने आम्हाला मिठी मारायला आणि जीवन साजरे करायला शिकवले. तिने अनेक लोकांना खूप काही दिले. नेहमीच आईचे ज्ञान, सकारात्मकता आणि आशिर्वाद आमच्या सोबत असतील. आम्ही आमच्या आठवणींद्वारे तिचे आयुष्य एकत्र साजरे करू. ओम शांती ओम.” माधुरीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट बॉक्समध्ये स्नेहलता दीक्षित यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली आहे.
माधुरी आणि डॉ श्रीराम नेने यांनी स्नेहलता यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली, त्यात ते म्हणतात, “आमच्या लाडक्या आई, स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले.” तिचे अंतिम संस्कार वरळीच्या वैकुंठ धाम येथे करण्यात आले, त्यावेळी माधुरी, तिचे पती डॉ. श्रीराम नेने आणि त्यांचा धाकटा मुलगा रायन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
माधुरी त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होती. दोन बहिणी आणि एक भाऊ असा त्यांचा परिवार. माधुरीचे वडिल शंकर दीक्षित यांचे २०१३ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले होते. माधुरीचा शेवटचा चित्रपट प्राईम व्हिडिओचा मजा मा (Maja Ma) हा चित्रपट होता, जो गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आनंद तिवाई दिग्दर्शित या चित्रपटात गजराज रावही प्रमुख भूमिकेत होते. माधुरीने नेटफ्लिक्स ड्रामा सीरिज, द फेम गेमद्वारे अभिनयात पुनरागमन केले होते. त्याची निर्मिती करण जोहरने केली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.