
‘छोटी सरदारनी’ आणि ‘महाभारत’ फेम अभिनेत्री मनिषा शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे. मानसी शर्माने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे, सोशल मीडियासह सर्वत्र अभिनेत्रीवर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे. मानसीने सोशल मीडियावर जुलै २०२३ मध्ये बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. तेव्हापासून अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत होती.
मानसी शर्माने २०१९ मध्ये युवराज हंससोबत लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला एक मुलगा असून अभिनेत्रीला आता दुसऱ्यांदा मुलगी झाली आहे. अभिनेत्रीच्या पहिल्या मुलाचं नाव हृदय असं आहे. मानसीने जुलै २०२३ मध्ये ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. त्यावेळी तिच्या फोटोंचीही प्रचंड चर्चा झाली होती. मानसी आणि युवराजच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे तर, या दोघांचीही ‘बॉक्स क्रिकेट लीग’ या कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. एकमेकांना बऱ्याच काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले.
मानसी शर्माने अनेक चित्रपटांसह काही मालिकांमध्येही मुख्य भूमिका साकारली होती. मानसीने तिच्या फिल्मी करियरमध्ये अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारली आहे. 'देवों के देव महादेव', 'पवित्र रिश्ता', 'महाभारत', 'चंद्र नंदिनी', 'उत्तरन', 'मनमोहिनी', 'मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह', 'पटियाला बेब्स', 'छोटी सरदारनी', 'चंद्रनंदिनी' यांसारख्या मालिकेंमध्ये मानसीने महत्वाचे पात्र साकारले.
दरम्यान, आजपर्यंत मानसी शर्माने साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या आहेत. पण मानसी २०२२ नंतर कुठल्याच मालिकेमध्ये दिसली नाही. तर पती युवराज हंसने 'यार अन्नमूल', 'मिस्टर अँड मिसेस 420', 'प्रॉपर पटोला', 'लाहोरिया'सारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मानसी शर्मा नेहमीच युट्यूबवर सक्रिय असते. ती एक प्रसिद्ध युट्यूबर असून तिच्या युट्यूब अकाऊंटचे नाव ‘मानसी शर्मा’ असेच आहे. तिचे यावर ६० हजारांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर तिचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती कायमच इन्स्टाग्रामवर पती युवराज आणि मुलगा हृदयसोबत रिल्स शेअर करत असते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.