Maharashtrachi Hasya Jatra: माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं की तुझ्या डोळ्यात.. लग्नाच्या वाढदिवशी नम्रता संभेरावने नवऱ्याला दिल्या खास शुभेच्छा

Namrata Sambherao: अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
Namrata Sambherao Post On Wedding Anniversary
Namrata Sambherao Post On Wedding AnniversaryInstagram @namrata_rudraaj

Namrata Sambherao Post On Wedding Anniversary: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून नम्रताने तिच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली असल्याचे सांगितले आहे. तसेच तिचा पती योगेश संभेरावला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी मालिकेतून आपल्या भेटीला येणारी नम्रता संभेराव तिच्या अभिनयाने आणि कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिचे लॉली हे पात्र प्रेक्षकांचे आवडतीचे पात्र आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या अभिनेत्रीने तिच्या जीवनातील एक खास गोष्ट तिच्या चाहत्यांसोबबत शेअर केली आहे. (Latest Entertainment News)

Namrata Sambherao Post On Wedding Anniversary
Hey Pawlay Dev Majha Malhari Song Maharashtra Shaheer Released: १५ दिवसांनी 'महाराष्ट्र शाहीर'मधील 'हे पावलायं देव माझा मल्हारी' नवं गाणं प्रदर्शित

नम्रताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जुळले रे नाते अतूट झाली जन्मजन्मांची भेट घेऊनिया प्रीतीची आण एकरूप होतील प्राण. आज आमच्या लग्नाला आणि सहवासाला 10वर्ष झाली पूर्ण झाली.

तुझी सोबत अशीच आयुष्यभर राहू दे हीच देवाकडे प्रार्थना माझ्या सुखात तू तुझं सुख मानतोस माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं की तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतात हे खूप अनमोल आहे हे असंच टिकवून ठेवूया. माझ्या कामाबद्दल तुला वाटणारा आदर हा मला खूप ताकद देतो बळ देतो. आय लव्ह यु मिस्टर संभेराव'.

नम्रताच्या या पोस्टवर ऋतुजा बागवे, अभिजित खांडकेकर, स्पृहा जोशी, प्रसाद जवादे या मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नम्रताच्या चाहत्यांनी देखील तिच्या पोस्टखाली कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com