Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामलेंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

प्रशांत दामले १९८३ पासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत.
Prashant Damle
Prashant Damle

Prashant Damle News: प्रशांत दामले हे एक दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी मराठीतील अनेक नाटक, सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ते ज्या कलाकृतीचा भाग असतात ती कलाकृती यशस्वी होते असा निर्मात्यांचा विश्वास आहे. प्रशांत दामले यांच्या नावावर अनेक विक्रम आणि पुरस्कारांची नोंद आहे. तसेच त्यांना एका नवीन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Prashant Damle
Hruta Durgule: जस्ट लव्ह!! महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळेच्या पोस्टनं गुलाबी थंडीतही वाढलीय गर्मी...

प्रशांत दामले यांनी संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट, नाटक आणि संगीत क्षेत्रातला दिग्गजांना हा पुरस्कार त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी हा पुरस्कार प्रशांत दामले यांना घोषीत करण्यात आला आहे. (Award)

प्रशांत दामले १९८३ पासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. 'आम्ही सारे खवय्ये' हा मालिकेच्या माध्यमातून ते नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहिले.

प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या नाटकाने नुकताच १२५०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या प्रयोगासाठी प्रशांत दामले यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहोत. एक नाटकांचे इतके प्रयोग होणे आणि करणे खरंच खूप मोठे यश आहे. प्रशांत दामले यांची पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाकडू शिफारस करण्यात येणार आहे. (Actor)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com