Vanita Kharat Struggle Story: हास्यजत्रा फेम वनिता खरातला इंडस्ट्रित येण्याआधी वाटायची भीती; केला मोठा खुलासा...

Vanita Kharat News: नुकतंच हास्यजत्रा फेम वनिता खरातने तिच्या स्ट्रगलवर भाष्य केलं आहे.
Vanita Kharat Struggle Story
Vanita Kharat Struggle StoryInstagram

Vanita Kharat Interview

लोकप्रिय टेलिव्हिजन कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच चर्चेत असतो. शोप्रमाणेच शो मधले कलाकार देखील चर्चेत असतात. नुकतंच अभिनेत्री वनिता खरात एका मुलाखतीमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या स्ट्रगलवर भाष्य केलं आहे. नुकतंच हास्यजत्रेतील अनेक कलाकारांनी रुईया महाविद्यालयामध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी तरुण पिढीसोबत संवाद साधला.

Vanita Kharat Struggle Story
Kareena Kapoor News: १० वर्षांनी मोठ्या सैफसोबतच्या लग्नापासून ते जेहदच्या जन्मापर्यंत..., चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांची करीना कपूरने दिली उत्तरं

तरुणांसोबत संवाद साधताना, वनिता खरात, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी वनिता खरातने संवाद साधताना तिच्या आयुष्यातील स्ट्रगलवर भाष्य केलं.

अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली, “आयुष्यात संघर्ष हा करावा लागतोच. हा शो संपल्यानंतर पुढे काम शोधण्यासाठी संघर्ष करावा लागेल, पण तो आधीसारखा नसेल. माझ्याकडे आधी वडापाव खायला सुद्धा पैसे नसायचे, आम्ही सर्वजण एकत्र पैसे करून वडापाव खायचो. या चंदेरी दुनियेत मी फीट होईल का? याची मला साशंकता होती. कारण त्यावेळी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे खूप सुंदर आणि सौंदर्यवती अशी एक समज होती. त्यामध्ये मी फीट होईल का ? याबद्दल माझ्या मनात खूप शंका होती. पण हास्यजत्रेत आली आणि खूप काही बदललं.”

Vanita Kharat Struggle Story
Adah Sharma Grandmother Saree: नऊवारी साडी अन् पायात स्निकर्स...; ‘केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा हटके फॅशनमुळे चर्चेत...

वनिता खरात आपल्या मुलाखतीत पुढे म्हणाली, “हास्यजत्रेनंतर माझ्यात खूप काही बदल झाला. मला वेगवेगळे पात्र साकारण्याची संधी मिळाली. मी सुद्धा इतर अभिनेत्रींप्रमाणे आणि मॉडेलप्रमाणे तितकेच सुंदर दिसू शकेल असा आत्मविश्वास मला हास्यजत्रेने दिला. माझ्याप्रमाणेच आज अनेक मुलींना असं वाटतं की, मी तिथे फिट होणार नाही, दिसायला सुंदर नाही असं वाटतं. ‘तू सगळ्या भूमिका साकारू शकतेस. जेव्हा तू साडी नेसतेस तेव्हा तू सगळ्यात सुंदर दिसतेस’ असा आत्मविश्वास मला सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांनी दिला. आजवर मी जेवढ्या भूमिका साकारल्या आहेत, त्या सर्व सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांमुळे शक्य झालं आहे.” अशी प्रतिक्रिया वनिता खरातने दिली आहे.

एकंदरीत वनिता खरातच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अभिनेत्रीने शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटामध्ये वनिताने मोलकरणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर अभिनेत्री २०२१ मध्ये न्यूड फोटोशूट मुळेही प्रचंड चर्चेत आली होती. त्यासोबतच ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमुळे देखील चर्चेत असते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com