
Namrata Sambherao's Emotional Post For Father: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नम्रता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील सहकाऱ्यांचे तर कधी फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असते. नुकतंच नम्रताने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्पेशल पोस्ट लिहिली आहे.
वडिलांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना नम्रताने लिहिले की, “Happy birthday pappa.. तेरी लाडकी मै.. मला माहितीय आमच्या 3 भावंडांपैकी मी लाडकी आहे माझ्या पप्पांची..अस्तित्व नावाची माझी पहिली एकांकिका.”
“वांगणी ला झाली होती ती स्पर्धा. 16वर्षांची होते, जाताना नाटकाच्या ग्रुप बरोबर गेले, पण येताना लेक रात्री एकटी कशी येणार ह्या काळजीमुळे माझे वडील मला न्यायला आले. आणि आलोच आहे तर काय करतेय लेक, कसं करते हे सुद्धा पाहिलं त्यांनी. ” (Marathi Actress)
नम्रताने पुढे पोस्टमध्ये लिहिलंय, “आणि तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, त्यांनी एकांकिका पाहिली, कौतुक झालेल पाहिलं, मला अभिनयासाठी प्रथम पारितोषिक मिळालं तेव्हा तेही पाहिलं. आणि सगळ्यात मोठं बक्षीस मिळालं मला त्यादिवशी पप्पांकडून, ते म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं पाणी, माझ्याबद्दलचा अभिमान, आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी. अजून काय हवंय.” (Entertainment News)
“मला आठवतंय जेवढं त्याप्रमाणे “बाहुलीच हवी मला द्या मज आणुनी” ह्या हट्टानंतर जर कुठला माझा हट्ट असेल तर तो म्हणजे “अभिनयच माझी कला घ्या तुम्ही जाणुनी” कारण पप्पांना मान्य नव्हतं हे क्षेत्र पण त्यामागे त्यांची माझ्याबद्दल वाटणारी काळजी होती. कोणीच नव्हतं ह्या क्षेत्रात माहितीतलं पण फक्त विश्वासाच्या जोरावर त्यांनी मला पाठिंबा दिला.” (Marathi Actress)
पोस्टच्या शेवटच्या भागात नम्रता संभेराव म्हणते, “नंतर जेव्हा आम्ही कधी बाहेर पडायचो अगदी कुठेही डॉक्टर कडे वगरे कि त्यांना सांगायचे माझी सगळी history , कुठली serial कुठलं award , सगळं जे मला आठवत नसे तेही सगळं सांगायचे. पण त्यांच्या डोळ्यातला आनंद त्यांचा उत्साह बघून मन भरून यायचं. माझे पप्पा जगात भारी आहेत माझं अतोनात प्रेम आहे त्यांच्यावर.. l love u pappa.” अशी भावनिक पोस्ट नम्रताने केली आहे. (Marathi Film)
नम्रताच्या कामाबद्दल बोलायचे तर, नम्रता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिएलिटी शोमधून महाराष्ट्राच्या प्रसिद्ध झाली आहे. सोबतच ती गेल्या काही दिवसांपुर्वी ती नाटकानिमित्त परदेशात देखील गेली होती. कुर्रर्रर्र नाटकाच्या प्रयोगानिमित्त नम्रता परदेश दौऱ्यावर होती. (Marathi Theater)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.