
Maharashtrachi Hasyajatra Shoot Final Episode: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही विनोदी मालिका महाराष्ट्रासह जगभर पोहोचली आहे. या मालिकेतून आपल्या भेटीला आला फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे. गौरवाने त्याच्या अभिनयाने आणि चार्मने सगळ्यांचे हृदयात घर केलं आहे. त्याच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा भेटला पाहायला मिळाव्यात असेल वाटते. अभिनयात सक्रिय असलेला गौरव मोरे सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रिय आहे.
गौरव मोरेने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्याच्या या स्टोरीमध्ये हास्यजत्रेतील सर्व कलाकार दिसत आहेत. त्याचसह दिग्दर्शक सचिन मोठे देखील या व्हिडिओमध्ये आहेत. सर्व कलाकार कॅमेऱ्याकडे बघून 'हाय' करत आहेत. (Latest Entertainment News)
गौरवने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'आनेवाले पल जानेवाला हैं' हे गाणे वाजत आहे. या गाण्यातून गौरवला काहीतरी सूचित करायचे आहे. चला तर मी जाणून घेऊया काय आहे गौरवच्या मनात.
गेली पाच वर्ष सतत सुरू असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हास्यजत्रेमधील अभिनेत्री प्रियदर्शिनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. यात हास्यजत्रेमधील कलाकार चित्रीकरण करताना दिसतायत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'शेवटच्या शेड्युलचा शेवटचा दिवस.'
प्रियदर्शनीने दुसरा फोटो पोस्ट करत लिहिले आहे, 'पुन्हा दोन महिन्यांनी भेटू.' महाराष्ट्राची हास्यजत्राचा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेत असला तरी पुन्हा २ महिन्यांनी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा काल शेवटचा भाग चित्रित करण्यात आला.
२९ मे रोजी कार्यक्रमाचा शेवटचा भाग टेलिकास्ट होणार आहे. त्यानंतर 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम याच वेळेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चा पुढचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.