Malaika And Arbaaz Son: मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

एका मुलाखतीमध्ये अरबाज मुलगा अरहान खानच्या बॉलिवूड पदापर्णाविषयी सांगितलेआहे.
Malaika And Arbaaz
Malaika And ArbaazSaam

Malaika And Arbaaz Son Bollywood Debut: अरबाज खान लवकरच सोनीलिव्हवरील वेबसीरीज 'तनाव'मध्ये दिसणार आहे. ही वेबसीरीज इस्त्रायली थ्रिलर शो 'फौदा'चे हिंदी व्हर्जन आहे. यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अरबाज मुलगा अरहान खानच्या बॉलिवूड पदापर्णाविषयी बोलला आहे.

त्यांचा मुलगा अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचा कोर्स करत आहे. त्याने अलीकडेच चित्रपट निर्माता करण जोहरला एका चित्रपटात असिस्ट केले होते. अरहान वडिल अरबाज यांना चित्रपट निर्मितीत मदत करणार आहे. अरहान खान, अरबाज आणि मलायका अरोरा यांचा एकुलता एक मुलगा आहे.

Malaika And Arbaaz
Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये मोठा खुलासा, अब्दू रोजिकने सांगितले टीना दत्ताच्या जोडीदाराचं नाव

अरबाज आणि मलायकाने 1998 मध्ये लग्न केले होते. 18 वर्षांहून अधिक काळ एकत्र राहिल्यानंतर मे 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांचा मुलगा अरहानचा जन्म 9 नोव्हेंबर 2002 रोजी झाला. (Bollywood)

अरहान बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार का, असे विचारले असता. यावर उत्तर देताना अरबाजने सांगितले की, माझा आगामी 'पटना शुक्ला' या चित्रपटात माझ्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. अरहानचे महाविद्यालयीन जीवन कसे सुरू आहे, हे सुद्धा अरबाजने सांगितले.

अरबाज म्हणाला, “माझा मुलगा अरहान सध्या लॉंग आयलँड फिल्म स्कूलमध्ये शिकत आहे, तो त्याच्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सत्रात आहे. तो तिथे आपला वेळ खूप एन्जॉय करतोय. त्याच्या मुलाने नुकतेच करण जोहरसोबत एका प्रोजेक्टमध्ये काम केले आहे आणि तो त्याच्या वडिलांसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटात काम करणार आहे. मी तो पुढच्या महिन्यात येण्याची आणि माझ्या चित्रपटात काम करण्याची वाट पाहत आहे कारण त्याला चित्रपट निर्मिती शिकायची आहे. (Movie)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com