
Malaika Arora Interview: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या गेली अंक वंश एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुनमुळे मलायका आणि अरबाज खान यांचा ब्रेकअप झाला असल्याचे म्हटले जाते. यावर मलायकाने अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे.
मलायका आणि अरबाज यांचा २०१७ साली विभक्त झाले. परंतु मुलगा अरहान साठी त एकत्र येतात आणि काही क्षण सेलेब्रेट करत असतात. अरबाजपासून वेगळे झाल्याच्या दोन वर्षानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचे नाते जाहीर केले होते. नुकत्याच झालेल्या एके मुलाखतीत मलायकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले.
दरम्यान या मुलाखतीमध्ये मलायकाला अर्जुनविषयी देखील प्रश्न विचारण्यात आले. तुझ्यापेक्षा वयाने छोट्या मुलाला डेट करायचा अनुभव कसा आहे? यावर प्रतिक्रिया देताना मलायका म्हणाली, मला वाटते की हे खूप अमेझिंग आहे.
जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मला सांगण्यात आले की हा टॅग नेहमी तुझ्यासोबत असेल. घटस्फोटानंतर खरं प्रेम मिळणं खूप वेगळीच गोष्ट आहे. मग एका आपल्यापेक्षा वयाने छोट्या व्यक्तीमध्ये प्रेम मिळणं, मला स्पष्टपणे सांगण्यात आले की मी माझा मार्बल गमावले आहे.
मलायका पुढे म्हणाली, मला एवढेच सांगायचे आहे की प्रेमाला वय नसते. जर तुम्ही प्रेम करता तर तुम्ही प्रेम करता. तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा वयाने लहान असो की मोठा, आपण कुठे आहोत हे कोणी ठरवू शकत नाही. मला समजून घेणारा जोडीदार मला मिळाला याबद्दल मी कृतज्ञ आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तो तरुण आहे आणि मला तो तरुण ठेवतो. मला असे वाटते की मी हवेत आहे.
मलायका या मुलाखतीत तिच्या लग्नाच्या प्लॅनबद्दलही सांगितले. ती म्हणाला की, प्रत्येक गोष्टीचा शेवट लग्न नसतो. लग्न ही अशी गोष्ट आहे ज्याची चर्चा दोन लोकांमध्ये होते. मलायकाच्या म्हणण्यानुसार तिने अद्याप लग्नाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. असं काही झालं की ती नक्की सांगेल. सध्या ती अर्जुनसोबत प्री-हनिमूनचा टप्पा एन्जॉय करत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.