Sirf Ek Banda Kafi Hai Movie: मनोज वाजपेयींचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; आसाराम बापू ट्रस्टने पाठवली कायदेशीर नोटीस

Asaram Bapu Trust Legal Notice: संत श्री आसारामजी चॅरिटेबल ट्रस्टने सेन्सॉर बोर्डाला बंदा चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.
Asaram Bapu Trust Send legal Notice To Manoj Bajpayee Movie
Asaram Bapu Trust Send legal Notice To Manoj Bajpayee Movie Instagram @bajpayee.manoj

Asaram Bapu Trust Demanded To Ban: मनोज वाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. तर मंगळवारी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस देखील मिळाली आहे. संत श्री आसारामजी चॅरिटेबल ट्रस्टने ही नोटीस पाठवली असून, त्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.

अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित, 'सिर्फ एक बंदा काफी है' मध्ये मनोज बाजपेयी यांनी पीसी सोलंकीची भूमिका केली आहे, ज्यांनी अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत खूप काल कायदेशीर लढा दिला. (Latest Entertainment News)

Asaram Bapu Trust Send legal Notice To Manoj Bajpayee Movie
The Kapil Sharma Show मध्ये रवीना टंडनने उडवली कपिलची खिल्ली: व्हिडिओ व्हायरल

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, एका अध्यात्मिक गुरूवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि त्याला POCSO कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. मनोज कोर्टात या मुलासाठी लढतो. या प्रक्रियेत त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. हा चित्रपट 23 मे रोजी ZEE5वर स्ट्रीम करण्यात येणार आहे.

अधिवक्ता सत्य प्रकाश शर्मा यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये त्यांच्यासाठी (आसाराम) रावण आणि बलात्कारी असे शब्द वापरले आहेत, जो त्यांच्या धार्मिक चारित्र्याचा अपमान आहे. चित्रपटाच्या रिलीजमुळे माझ्या क्लायंटची देश आणि परदेशात प्रतिमा खराब होईल, ज्यामुळे अनुयायी आणि समर्थकांना राग येईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. असे म्हटले आहे.

या शिक्षेविरोधातील अपील राजस्थान उच्च न्यायालयात प्रलंबित असून या चित्रपटामुळे माझ्या अशिलाच्या गोपनीयतेवर परिणाम होऊ शकतो, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. आसाराम बापू बलात्कार प्रकरणात जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

'सिर्फ एक बंदा काफी है' चित्रपटाचे सह-निर्माते आसिफ शेख यांनी नोटीसविषयी बोलताना म्हटले आहे की, 'आमची कायदेशीर टीम याला उत्तर देईल. आम्ही अॅडव्होकेट पी सी सोलंकी यांच्या बायोपिकचे हक्क विकत घेतले आहेत. हा त्यांचा बायोपिक चित्रपट आहे. निर्माते विनोद भानुशाली, मनोज वाजपेयी, झी स्टुडिओज, दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की यांनाही नोटीसची प्रत पाठवण्यात आली आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com