Godavari: नदीविषयी कटुता आणि प्रेम असणाऱ्या 'गोदावरी'साठी नदीची आरती

चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करत 'गोदावरी'च्या टीमने पंचवटी येथे 'गोदावरी' नदीची आरतीही केली.
Godavari River Aarti
Godavari River Aarti Saam Tv

Godavari Marathi Movie: राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपले नाणे खणखणीत वाजवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता आपल्या मायदेशी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.

आता चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करत 'गोदावरी'च्या टीमने पंचवटी येथे 'गोदावरी' नदीची आरतीही केली. यावेळी जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, संजय मोने, लेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक निखिल महाजन, जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते.

Godavari River Aarti
Bigg Boss Marathi 4: कॅप्टन बनण्यासाठी यशश्री उत्सुक, अमृता आणि तेजश्रीकडे मागितली मदत

निशिकांतचा कुटुंबासोबत असलेला नात्यातील चढउतार, परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण 'गोदावरी' मध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटात मुख्य दुवा 'गोदावरी' नदी आहे. या नदीने सुख आणि दु: ख दोन्हीही अनुभवले असून नदीसोबतचे अनोखे नाते या चित्रपटातून उलगडणार आहे.

'गोदावरी' नदीविषयी मनात कटुता असणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे गणित चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल. चित्रपटाची उत्सुकता ट्रेलर, जबरदस्त संगीत, दर्जेदार कथानक, दिग्दर्शक आणि कलाकार यांनी वाढवली आहे.

Godavari River Aarti
Kangana Ranaut: 'अति घाई संकटात नेई', कंगनाला ओव्हर एक्साइटमेंट पडली महागात

चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, '' राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवात अनेक पुरस्कार मिळवल्यानंतर आता 'गोदावरी' महाराष्ट्रात घरा-घरात पोहोचणार आहे. हा एक भावनिक आणि कौटुंबिक चित्रपट आहे, जो मनाच्या खोलवर जाणारा आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो

आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्व अधोरेखित करणारा 'गोदावरी' संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने आमचे कुटुंब पुन्हा एकदा खळाळत्या नदीसाठी, नदीकाठी भेटलो आहोत."

Godavari River Aarti
Samantha Ruth Prabhu: समांथा दिसणार अॅक्शन पटात, स्टंटने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष

'गोदावरी' बद्दल जितेंद्र जोशी म्हणतात, "गोदावरीच्या निमित्ताने मी एक नवी सुरूवात करतो आहे. कारण 'गोदावरी' हे निर्मिती क्षेत्रातील माझं पहिलं पाऊल असणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा नाशिकला येऊन ‘गोदावरी’नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने आमचे 'गोदावरी'चे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले.

इथल्या गल्लीतून फिरताना पुन्हा चित्रीकरणाच्या त्या भावनिक आठवणी ताज्या झाल्या. नाशिकसोबत आता एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. विशेषतः गोदावरीसोबत. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट असून आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे."

Godavari River Aarti
Wonder Women Trailer: 'वंडर वूमन' अमृताने दिली गुडन्युज, ट्रेलरने चाहत्यांचे लक्ष वेधले

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणी विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने भारतच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड 'कान्स' या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ या एकमेव मराठी चित्रपटाचा समावेश होता. त्याचबरोबर इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल (NYIFF),वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय - इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात 'गोदावरी'ने आपली मोहोर उमटवली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com