Actor Kiran Mane Meets Sharad Pawar
Actor Kiran Mane Meets Sharad PawarSaam Tv

Actor Kiran Mane: अभिनेता किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दीड तास चर्चा

Actor Kiran Mane Meets Sharad Pawar: माझ्याबाबत जे घडलं त्याची दाद मागण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली असल्याचं किरण मानेंनी सांगितलं.

मुंबई: मराठी मालिका ‘मुलगी झाली हो’ यामध्ये भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर राज्यात आता अनेक लोकांकडून माने यांना पाठिंबा मिळत आहे. या प्रकरणावर आता अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही भेट झाली. माझ्याबाबत जे घडलं त्यासाठी दाद मागण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली असल्याचं किरण मानेंनी सांगितलं. (Actor Kiran Mane Meet Sharad Pawar in Mumbai)

हे देखील पहा -

शरद पवारांच्या भेटीबाबत पुढे म्हणाले की, सांस्कृतिक दहशतवादाविरोधात आवाज उठवायचा असेल तर एकच नेता आहे जो विवेकी आहे, विचारी आहे आणि सांस्कृतिक क्षेत्राची माहिती असलेला एकच नेता म्हणजे शरद पवार आहे असं अभिनेता किरण माने म्हणाले. तसेच शरद पवारांसमोर मी माझं बोलणं मांडल, मा त्यांच्याकडे दाद मागितली. शरद पवारांनी सगळं शांतपणे ऐकलं. त्यांनी खोचक सवालही विचारले, त्यातून काय करायचं हे ता आता ठरवतीलल. शरद पवारांसमोर कुणीही खोटी व्यक्ती टिकत नाही, असंही ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com