Onkar Bhojane: 'हास्यजत्रा सोडून मी आनंदीत...'ज्यामुळं करिअर घडलं त्यावरच ओंकार थेट बोलला
Onkar Bhojane: आपल्या कॉमेडीने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने गेल्या अनेक दिवसांपासून बराच चर्चेत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली होती. ज्या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली त्या मालिकेला सोडल्यानंतर त्याला ट्रॉलर्सने बरेच ट्रोल केले. सध्या ओंकारची एक मुलाखत सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. त्यात त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रेत आलेल्या अनुभवाबद्दल भाष्य केले.
ओंकार लवकरच अमृता खानविलकर सोबत 'कलावती' चित्रपटात दिसणार आहे. त्या चित्रपटात तिच्या सोबत तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्त त्याला या चित्रपटाबद्दल आणि कलाकारांबद्दल विचारण्यात आले.
त्यावर तो म्हणतो, “मी खूप जास्त आनंदी आहे. मी अमृता खानविलकर, संजय जाधव यांच्याबरोबर काम करतोय, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यांना पाहूनच प्रत्येक कलाकार या क्षेत्रात काम करायचं हे ठरवत असतो. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यांच्याबरोबर काम करताना मला फार मज्जा येते.”
ओंकारने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडल्यानंतर त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे ओंकारला 'हास्यजत्रा सोडणं हे कुठेतरी लकी ठरलंय असं म्हणू शकतो का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने मनमोकळेपणाने भाष्य केले.
“मी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडणं लकी ठरलं की नाही, असं आपण म्हणू शकत नाही. या चर्चेत काहीही तथ्य नाही. ते माझं एक काम आहे. मला हास्यजत्रेच्या मंचामुळे ओळख मिळाली. मी तिथे राहून अनेक गोष्टी शिकलो. त्यामुळे ते सोडणं माझ्यासाठी लकी कसं काय असू शकतं?” असा प्रश्न ओंकार भोजनेने उपस्थित केला.
“मी जितका वेळ तिथे काम केले आहे. त्यात मला फार आनंद मिळाला. मला वेगळ्या कामासाठी त्यातून बाहेर पडावं लागलं. तो एक क्रम होता. त्यामुळे लकी, अनलकी असं काहीही नाही. त्या उलट महाराष्ट्राची हास्यजत्रा, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, या सर्वांबरोबर माझे अनुभव हे माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून घडण्यासाठी खूप महत्त्वाचे होते” असेही ओंकार भोजनेने सांगितले.
संजय जाधव दिग्दर्शित 'कलावती' चित्रपटाची निर्मिती प्रजय कामत यांनी केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्वनी लोणारी, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, संजय सेजवाल, नील सालेकर हे कलाकार दिसणार आहेत. अद्याप चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.